महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. दादांची आजची दिल्लीवारी ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने असल्याची माहिती मिळाली आहे.
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. राज्यांतील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेट असण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील सोबत आहेत, अजित पवारांची ही भेट मंत्रीमंडळ विस्ताराबाबत असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार दिल्लीत कोणाला भेटणार, कोणाशी चर्चा करणार, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.
No comments:
Post a Comment