कराड
येथील नगरपरिषद शाळा क्रमांक दहाच्या पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा काल मृत्यू झाला बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रात्री साडेनऊच्या सुमारास घटना उघडकीस आली. दरम्यान,याप्रकरणी रात्री पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला आहे. त्या प्रकरणात तीन ठेकेदारांना अटकही केली आहे. सत्यजितसिंह जगताप तर समीर पटवेकर आणि खाजा अमीन सत्तार मडकी अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment