वेध माझा ऑनलाइन - संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजला आहे पण महाडिक नावाचा कोल्हापुरात दबदबा काल होता आजही आहे आणि यापुढेही असणार अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी आपल्या विजयानंतरची प्रतिक्रिया कराड येथे दिली यापुढील राजकारणात आपल्या विजयाचा परिणाम कोल्हापुरात नक्कीच दिसेल असेही त्यानी यावेळी सांगितले
ते पुढे म्हणाले...
राज्यसभा निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ होते. त्यामुळेच माझी उमेदवारी जाहीर झाली होती. आता महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून घोडेबाजार केल्याचा आरोप केला जात आहे. संख्याबळ पुरेसे असल्याने भाजपाकडून घोडेबाजार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. या निवडणुकीत तीन जूनला अर्ज माघारी घ्यावा लागेल असे वाटले होते. मात्र निवडणूक लागली आणि मतमोजणीवेळी वाट पहावी लागली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना महाराष्ट्रात एकत्र आली असली तरी कोल्हापूरमध्ये पूर्वीपासून हे तिन्ही पक्ष महाडीक कुटूंबाविरूद्ध एकत्र आहेत.भाजपाचा कोल्हापूर जिल्ह्यात आमदार, खासदार नाही. जिल्हा परिषदमध्ये आमची सत्ता होती, ती आता नाही. कोल्हापूर महापालिकेत सत्ता नाही आणि म्हणूनच ही सर्व सत्तास्थाने पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे धनंजय महाडीक यांनी सांगितले
No comments:
Post a Comment