Sunday, June 12, 2022

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद...

वेध माझा ऑनलाइन - राज्यसभा खासदार धनंजय  महाडिक हे आज येथील पंकज हॉटेल येथे आले होते त्यावेळी अचानक तेथे आलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या ते चकक पायाच पडले  त्यांचे आशीर्वाद घेतले त्यामुळे त्याठिकाणच्या उपस्थितांच्या भुवया त्यावेळी उंचावल्या

आज खासदार धनंजय महाडिक येथील पंकज हॉटेल येथे आले असता त्याठिकाणी येथील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले त्याचवेळी पत्रकार संवाद उरकून ते कोल्हापूरकडे जात असताना अचानक त्याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आले त्यावेळी गाडीतून उतरून धनंजय महाडिक हे चक्क राजू शेट्टींच्या पायाच पडले व त्यांचे आशीर्वाद घेतले अचानक या दोघांच्या पंकज हॉटेल येथिल भेटीची त्याठिकाणी बराच वेळ चर्चा होती

 माझे चांगले मित्र धनंजय महाडिक खासदार झाले याचा खूप आनंद आहे अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी यावेळी दिली

No comments:

Post a Comment