Tuesday, October 31, 2023

मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली ; फोन जण ताब्यात ;

वेध माझा ऑनलाईन । वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्तींच्या वतीनं हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी आमदार निवास इथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. मंत्रालयातही येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांना आत सोडलं जात आहे. तसेच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत, त्या मरिन लाईन्स पोलीस स्थानकात नेण्यात आल्या आहेत. 

गाडीच्या तोडफोड प्रकरणी बोलताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावं. त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, अशी माझी विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरं जाळणं हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. 

काय घडलं नेमकं? 
काही वेळापूर्वीच ही घटना घडली. साधारणतः सात, साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. तिथेच हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती. त्या गाडीवर दोन मराठा आंदोलकांनी हल्ला केला. त्यांनी गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. गाडीची पूर्ण तोडफोड करण्यात आली. गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. चौकशीनंतर ही गाडी मंत्री हसन मुश्रीफ यांची असल्याची माहिती मिळाली. काही मराठा आंदोलकांनी मंत्री मुश्रीफ यांची गाडी हेरुन गाडीवर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. 

मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. मंत्रालयाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्याच बाजूला आमदार निवास आहे. या आमदार निवासच्या खाली मंत्री हसन मुश्रीफांची गाडी उभी होती. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. तसेच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


ठिकठिकाणी आंदोलने; अनेक महामार्ग ठप्प ; राजकीय नेते लक्ष्य; गाड्यांची तोडफोड ; सरकारने बोलावली आज सर्वपक्षीय बैठक ; मंगळवारी सात जणांच्या आत्महत्या... जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। : आज शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. शासनाने शिंदे समितीचा अहवाल स्वीकारावा. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी.

दरम्यान, राज्यभरात आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर  जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. नांदेडच्या कोटा फाटा येथे उपोषणकर्त्यावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले.

जरांगे पाटील म्हणाले...
शासनाने जाती-जातींमध्ये भांडणे लावू नयेत. कोणाला रस्त्यावर यायचे त्यांनी यावे. इंटरनेट बंद करा किंवा इतर जातींना अंगावर घाला. 
परंतु आता मराठ्यांचे आंदोलन थांबणार नाही. आपण भाऊ-भाऊ म्हणतो; परंतु कोणी अंगावर आले, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. आत्महत्या करू नका, कायदा हातात घेऊ नका. 
बीडमध्ये झालेला प्रकार कोणी केला ते माहिती नाही; परंतु शांततेत सुरू असलेले आंदोलन करू द्या. पोरांवर गुन्हे दाखल करून त्रास देऊ नका, अन्यथा मी बीडमध्ये जाईन.

कराडात मुजावर कॉलनीतील स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू ;

वेध माझा ऑनलाइन। कराड येथील मुजावर कॉलनीत आठ दिवसापूर्वी शरीफ मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेल्या सुलताना मुल्ला (वय 33) या महिलेचा कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

25 ऑक्टोंबर रोजी मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळी अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांचे नुकसान झाले. याशिवाय सहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या स्फोटामुळे तीन घरातील सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. 

हा स्पोट झाल्यानंतर सातारा पुणे व अन्य ठिकाणाहून फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या हा स्फोट नेमका कशाने झाला याची अद्याप माहिती संबंधित प्रशासनाने जाहीर केली नव्हती मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला होता.

या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या घरातील दोन लहान मुलासह त्यांच्या पत्नी व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते. या जखमीवर कराडच्या स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. यादरम्यान शरीफ मुल्ला यांच्या पत्नी सुलताना मुल्ला (वय 33) यांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही ; ...अन्यथा पुन्हा जलत्याग करणार ; जरांगे पाटील यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे. पण, मनोज जरांगे(पाटील) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. रात्रीपर्यंत निर्णय घ्या अन्यथा मी जलत्याग करेन, असे जरांगे पाटील यांचे म्हणने आहे.

माध्यमाशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीचा पुनरुच्चार केला. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारही नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत. उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका, महाराष्ट्र शांत आहे, सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी 5 लाख येतील, अथवा 10 लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करु द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मंत्रीमंडडळाच्या बैठकीत मोठा निर्णय ; 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार ; बातमी वाचा सविस्तर ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात  यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. आज, झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
 
राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळाकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.
 
आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली.  यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.  

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत 12 टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

राज ठाकरेंचे जरांगे पाटीलांना पत्र ; काय म्हटलंय पत्रात...नक्की वाचा...

वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज मंगळवार (31 ऑक्टोबर) सातवा दिवस असून आरक्षणासाठी आपला लढा आपण चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून आरक्षणप्रश्नावरून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही आहे. अश्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र लिहून उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. “खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं” अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्रातुन केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरुन (पूर्वीचे ट्वीटर) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहित ‘तात्काळ उपोषण थांबवावं,’ अशी विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी पत्राची सुरुवात ‘प्रिय बंधु जरांगे पाटील’ असा उल्लेख करून केली. ते आपल्या पत्रातून म्हणाले, “इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.”

“तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.” ते पुढे म्हणाले.

मग महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला..
राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण यांसारख्या प्रश्नांमुळे समाजा – समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी राज ठाकरे आपल्या पत्रात पुढे लिहितात, “आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.”

आर्थिक निकषांवर असावं आरक्षण 
“आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेंव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.”
“भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे.”

शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला ; नव्याने इमपीरिअल डेटा गोळा करणार ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ;

वेध माझा आँनलाईन । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जाळपोळीच्या घटनांनंतर अनेक नेत्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अर्धवट आरक्षण नको, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत करण्यात आला. तसेच कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार असल्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाला हिंसक वळण ; गोंडवलेत बस फोडली ! ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाला हिंसक वळण मिळाले आहे. अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाल्याने बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात रात्री मुक्कामी असलेली बस फोडल्याचा प्रकार गोंदवले गावात घडला आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. रास्ता रोको, तोडफोड, टायर जाळली जात आहेत. शिवार रस्त्यावरून जाणाऱ्या बसचे देखील नुकसान केले जात आहे. या दरम्यान नाशिक ते गोंदवले बस रात्री साडेबारा वाजता मुक्कामी असताना गोंदवले बुद्रुक येथे अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. बसच्या पुढील व मागील काचा फोडल्याने बसचे नुकसान झाले आहे

गोंदवले बुद्रुक येथे सिन्नर डेपोची बस नाशिक  गोंदवले ही बस मुक्कामी होती. सोमवारी रात्री साडेबारा वाजता अज्ञात लोकांनी बसवर दगडफेक करून पुढील व मागील काचा फोडल्या. याबाबत रात्री लगेच दहिवडी पोलिस ठाण्यात फोन केल्यावर लगेच पोलिस गाडी घटनास्थळी दाखल झाली. देवस्थान ट्रस्ट येथे विश्राम करत असलेले चालक व वाहक याना उठवण्यात आले. त्यानंतर बस दहिवडी डेपोमध्ये आणण्यात आली. घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

Monday, October 30, 2023

मुख्यमंत्र्यांशी जरांगे पाटील यांचा संवाद ; म्हणाले... ; अर्धवट आरक्षण घेणार नाही ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सकाळी (31 ऑक्टोबर)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज सकाळी फोनवरून संवाद साधला.  त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.  मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत  नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले,  आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत.मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.

मराठा समाजाला जरांगेंचे आवाहन
कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

जाळपोळ बंद करा,अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल...; जरांगे पाटील यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेली जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाइलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत, असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली.

गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला शांततेत लढा सुरू आहे; परंतु काही ठिकाणी होणारी जाळपोळ, उद्रेक पाहता थोडी शंका येत आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी हा लढा आहे. त्यामुळे जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. 
बहुतेक सत्ताधाऱ्यांतीलच लोक कार्यकर्त्यांच्या हाताने घरे जाळून घेताहेत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावतायत, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.
आपल्याला आरक्षण मिळणारच. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येईल. आपल्या दारात कोणीही यायचे नाही आणि त्यांच्या दारात आपण कशामुळे जातोय, असा सवाल करीत तुम्ही सत्ताधाऱ्यांचे असो किंवा सामान्य मराठा असोत, शांततेत आंदोलन करा, जाळपोळ करू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले

मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी; मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणावर अध्यादेश येण्याची शक्यता, विशेष अधिवेशन बोलवणार

वेध माझा ऑनलाइन। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत  मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय होऊ शकतो. शिवाय एक-दोन दिवस विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन त्यात अध्यादेशाला मंजुरी घेतली जाण्याची दाट शक्यता  वर्तवली जात आहे.आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. दरम्यान भाजपा आमदारांचीही बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतं.  

मिळालेल्या वृत्तानुसार, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्दयावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. याच विषयावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मध्यरात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा झाली. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुणबी प्रमाणपत्राबाबत न्या. शिंदे समितीचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहिती दिली. याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच अध्यदेशाबरोबर एक-दोन दिवसांत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात या अध्यादेशाला मंजुरी घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.

विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता 
सध्या महायुतीच्या सरकारला दोनशेहून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात कायदा मंजूर करण्यात अडचण येणार नाही. मराठा आरक्षणच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून देखील आरक्षणाच्या कायद्याला विरोध होणार नाही. मराठा आरक्षणाचा कायदा  विशेष अधिवेशनात मंजूर झाल्यास मराठा समाज शांत होण्यास मदत होईल. त्यामुळे या निर्णयामुळे  सरकारवरील संकट सध्या तरी टळेल.  अधिवेशनात मंजूर होणाऱ्या कायद्यानुसार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार की ओबीसीतून हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. 


मुख्यमंत्र्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा, आता आमदार-खासदारांची बैठक बोलावली; राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

वेध माझा ऑनलाईन । राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून आता राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली, नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट झाली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांची भेट बोलावली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा चिघळलेला विषय, मनोज जरांगेंचे आंदोलन यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 

ओबीसी नेत्यांना सुरक्षा पुरवणार
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी एक बैठक झाली. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये ओबीसी नेत्यांना धमक्या येत असल्यामुळे तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी करण्यात आली. समता परिषदेच्या बीडच्या कार्यकर्त्याचं हॉटेल जाळल्यानंतर भुजबळांनी गृहमंत्र्यांकडे ओबीसी नेत्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसी नेत्यांना तात्काळ सुरक्षा देण्याबाबत दोन्हीही नेत्यांना आश्वासन देण्यात आलं. 

पोलीस महासंचालक रजनीश शेठ वर्षा बंगल्यावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. त्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या अनुषंगाने चर्चा झाली. राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन निर्णय घेण्यासाठी बैठक झाल्याची माहिती आहे. 

राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक 
मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असल्याचा संदेश देत मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीच्या माध्यमातून मराठा आंदोलन, सद्य स्थिती आणि कायदा, सुव्यवस्था यांचा आढावा घेणार आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला लावली आग ; मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्त्याचे हॉटेल पेटवले ;

वेध माझा ऑनलाइन । मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत मराठवाड्यात 3 तहसीलदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत.  परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे तहसीलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. असे असताना बीडमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी भवन पेटवल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आलेली आहे. शिवाय माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे. बीडमध्येच मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं हॉटेल पेटवून देण्यात आलेलं आहे.

बीड शहरामध्ये आगीच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी शांतता पाळावी, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. बंगल्याच्या आवारात प्रवेश करत आंदोलकांनी प्रकाश सोळंकेंच्या गाड्याही जाळल्या. नंतर घर पेटवून देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मी समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय ही शंका येतेय. जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणूनबुजून त्यांचीत घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.

बीडसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले की, सर्वाना माझी हात जोडून विनंती, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचं आहे. आपण कुणाच्याही दारात जाचचं नाही.

हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल, तर फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. राज्यातील मराठे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या  कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झालीय. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची सूचना करु शकतात. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय किंवा विचार विनिमय करण्याचा निर्णय होऊ शकतो. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

एक मराठा लाख मराठा ... कराडात मराठा समाजाचा विराट मोर्चा ; प्रशासनाला दिले निवेदन;

वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ५० टक्यांच्या आत आरक्षण मिळावे यासाठी कराड येथे आज सोमवारी कऱ्हाड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.

यावेळी शहरासह परिसरातील मराठा समाजातील लोक हजारोच्या संख्येने शहरात दाखल झाले. आज सकाळी कराडच्या येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला एक मराठा लाख मराठा... कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय ... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या
मोर्चात युवकांसह अबाल वृद्धांसाहित महिलांचा सहभाग लक्षणीय होता 
सदर मोर्चा शिवतीर्थ दत्त चौक – चावडी चौक – जोतिबा मंदिर – आंबेडकर पुतळा – महात्मा फुले पुतळा – चर्च – हेड पोस्ट – बस स्टँड – शिवतीर्थ या मार्गाने तहसीलदार कार्यालयासमोर आला.
यावेळी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले.

तीन युवक चढले टॉवरवर...पोलिसांची उडाली तारांबळ...

मोर्चा मधील सहभागी मराठा बांधव तहसील कार्यालयापासून परतत असताना दत्त चौकात मोर्चात सहभागी झालेल्यांपैकी तीन युवक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील बिल्डिंगवर फ्लेक्स बॅनर साठी उभा केलेल्या टॉवरच्या टोकावर चढले होते. जमिनीपासून हा टॉवर खूप उंचावर आहे. त्यामुळे ते तरुण खाली उडी मारतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या तणाव निर्माण झाला होता. यावेळी दत्त चौकात मोठी गर्दी जमा झाली. लाऊड स्पीकर सिस्टीम वरून टावरवर चढलेल्या युवकांना खाली येण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले, काही वेळानंतर ते तीनही तरुण सुखरूप खाली उतरले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र अचानक या तरुणांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे कराडकरांच्या काळजाचा ठोका काहीकाळ चुकला होता तर त्यावेळी पोलिसांची चांगलीच पळापळ झाल्याचे पहायला मिळाले

सुप्रिया सुळे म्हणाल्या... एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय घटना गंभीर ; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.;

वेध माझा ऑनलाइन। राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही सुळे यांनी केली. 

राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. यावर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. माजलगावच्या पंचायत समितीमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली. हे राज्य सरकारचं अपयश आहे.

मराठा, धनगर आणि लिंगायत आरक्षणामध्ये फसवाफसवी सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची चौकशी करावी. राज्याच्या गृहमंत्र्यांना हे झेपत नाही, तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा.

आमदार मकरंद पाटील यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे ! ;

वेध माझा ऑनलाइन।  वाईचे आमदार मकंरद पाटील यांना त्याठिकाणच्या ग्रामीण भागात मराठा आंदाेलकांनी काळे झेंडे दाखवत आरक्षणाची मागणी केली. 
दरम्यान मराठा आंदोलकांनी आमदार मकरंद पाटील यांच्या झालेल्या वाढदिवसाच्या बँनरला देखील काळे फासले होते.
वाई विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे मोळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी निघाले असताना संतप्त आंदोलकांनी आमदार मकरंद पाटील यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मराठा आंदोलक आक्रमक, आमदारांच्या घर अन् कार्यालयावर हल्ले ; मुंबईत नेत्यांच्या सुरक्षेत वाढ ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनास सोमवारी हिंसक वळण लागले. मराठा आरक्षणावरून जाळपोळ, दगडफेक अन् तोडफोड होत आहे. यामुळे एसटी महामंडळाने अनेक बसेस रद्द केल्या. राज्यातील विविध भागांत आंदोलक आमदारांना लक्ष करत आहेत. त्याचा फटका आमदार प्रशांत बंब, आमदार नामदेवराव ससाने, आमदार राहुल आहेर यांना बसला. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण संवेदनशील झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीची शिफारस स्वीकारली असल्याचे सांगितले.

आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले
सोमवारी दुपारी आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयात प्रवेश केला. गंगापूर शहरातील त्यांचे कार्यालय आंदोलकांनी फोडले. कार्यालयातील काचा फोडल्या. खुर्च्या तोडल्या. त्यापूर्वी मराठवाड्यातील माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर पेटूवले. त्यानंतर माजलगाव नगरपालिकाही पेटवून दिली.

यवतमाळमध्ये आमदार ससाने यांना रोखले
उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनाही मराठा आंदोलनाचा फटका बसला. यवतमाळ येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात जात असताना मराठा समाज बांधवांनी त्यांची गाडी अडवली. यामुळे मराठा आंदोलनाची धग मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत सर्वत्र पोहचली आहे. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मालेगावात राहुल आहेर यांना फटका
मालेगावात मराठा आंदोलनाचा फटका राहुल आहेर यांनाही बसला. आंदोलकांनी त्यांची गाडी आडवली. मालेगाव पुणे महामार्ग रोखला. नांदगाव फाट्यावर कौळाने येथे महामार्ग रोखला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईत नेत्यांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईतील काही नेत्यांची घरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्याचे कॅबीनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या शासकीय सिद्धगड निवासस्थानी सुरक्षा मोठया प्रमाणात वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी जरंगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


मराठा आरक्षणप्रश्नी खासदाराने दिला राजीनामा ; कोण आहे खासदार ?

वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाप्रश्नी चाललेल्या आमरण उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने आता लवकरात लवकर पावले उचलावित यासाठी आणि जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा आंदोलकांकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. यातच, शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी, आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार हेमंत पाटील यावेळी म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही. राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाम देत आहे.”
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. त्यामुळे सोमवारी राज्यात विविध ठिकाणी जाळपोळ, आमदारांना अडवण्याचे अशा पद्धतीने आंदोलन आक्रमक होत चालले आहे. या घडामोडी घडत असताना राज्याचे विरोधी पक्ष विशेष अधिवेशनासाठी  आग्रही असून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिले.
राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही. याकडेही राज्यपालांचे लक्ष वेढण्यात आले.

कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, शेतमालाला भाव नाही. अंमली पदार्थांचे मोठे साठे सापडले असून राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हे सर्व प्रश्न राज्यातील जनतेच्या हिताचे असून या विषयांवर विधिमंडळात चर्चा होऊन राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे हे जनतेला समजणे गरजेचे आहे म्हणून राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदय यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.


पटोले म्हणाले की, मराठा समाजात असंतोषाची भावना असून उद्रेक होईल अशी स्फोटक परिस्थिती आहे. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड झाले आहे, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून मराठा समाजातील तरूण आत्महत्या करत आहेत. राज्यपाल महोदय हे केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा आहेत त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी आरक्षण विषयावर बोलावे तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून त्यांनाही आश्वस्त करावे. जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे, अघटीत घडू नये यासाठी मध्यस्थी करा व प्रश्न सोडवा अशी विनंती करण्यात आली आहे.


सप्टेंबर महिन्यापासूनच राज्यातील विविध जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असून यात दररोज वाढ होत आहे. कमी पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यातील खरीप पीकं गेली आहेत तर रब्बी हंगामाची स्थितीही फारशी चांगली नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. दिवाळीचा सण आठ-दहा दिवसांवर आला आहे आणि शेतकऱ्याचे हात मात्र रिकामे आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी उजळून निघाली पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत दिली पाहिजे. आदी मागण्या यावेळी राज्यपालांकडे करण्यात आल्या.

उद्यापासून राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करणार ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन ।  आरक्षणसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे उद्यापासून राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत  केली आहे
तसेच मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने जी समिती नेमली आहे त्या समितीकडून पहिला अहवाल सादर करण्यात आला आहे शिंदे समितीत जेवढ्या कागदपत्रांची तपासणी झाली आहे त्यामध्ये जेवढ्या नोंदी झाल्या आहेत त्यानाच दाखले देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे

 ब्रेकींग...👍

मराठा आरक्षण झाले सोपे, १५ हजार कागदपत्रांमुळे आशा पल्लवीत…

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षण संदर्भात सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्या. शिंदे समितीने त्यांचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे. यातून मोठी माहिती समोर आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. न्या. शिंदे समितीला सरकारने नुकताच दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या समितीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालामुळे मराठा समाजाला दिलासा मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी जरांगे-पाटील यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे. यामागे कोण आहे, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे काम सुरू झाल्यानंतर आणि सरकारला ४० दिवसांची दिलेली मुदत संपल्यानंतरही आरक्षण न मिळाल्यामुळे जरांगे-पाटील संतप्त झाले होते. समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिल्याने हा वेळकाढूपण असल्याची टीका होत होती. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे आणि आता त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

न्या. शिंदे समितीने आतापर्यंत १ कोटी ७३ लाख कागदपत्रांची तपासणी केली असून ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. न्या. शिंदे समितीने त्यांचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे. डिसेंबरमध्ये न्या. शिंदे समिती सरकारकडे अंतिम अहवाल सादर करेल. तोपर्यंत न्या. भोसले, न्या. शिंदे आणि न्या. गायकवाड यांची समिती सरकारने स्थापन केली असून मराठा समाज कसा मागास आहे, याचा अभ्यास करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. आता न्या. शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

जरांगेची तब्बेत खालावल्याने महिलेने फोडला हंबरडा ; विष पिण्याच्या दिला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत असून त्यांचे अंग थरथरत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करा, अशी मागणी एका महिलेने केली आहे. एवढेच नाही तर जरांगे-पाटील यांच्यावर तातडीने उपचार न केल्यास आपण विष पिऊन आत्महत्या करू, असा इशाराही या महिलेने दिला आहे. सरकार आरक्षण देण्यास जाणूनबुजून विलंब करत आहे. अशात जरांगेंचे काही बरेवाईट झाल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले तर काय फायदा, असा सवाल करत सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावे, जरांगेंचा अंत पाहू नये, अशी विनवणी या महिलेने केली आहे.

ही महिला अंतरवाली सराटी गावात जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी आली होती. मात्र, जरांगे यांची प्रकृती पाहून तिने हंरबडा फोडला. त्यामुळे आता उपोषण स्थळी वातावरणात तणाव आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर २५ ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात केली. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याची झळ दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पाटील यांनाही बसली आहे. आता तर जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक गावागावांत कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी आक्रमक मराठा समाज नेत्यांना गावात येण्यापासून रोखत आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे.


Sunday, October 29, 2023

शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कराडमध्ये हिंदू एकता आंदोलनाकडून 350 ढोल ताशा पथकासह 100 भगव्या ध्वजांची मानवंदना ;


वेध माझा ऑनलाइन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन समितीकडून व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून 350 ढोल ताशा पथकासह 100 भगव्या ध्वजांची मानवंदना देण्यात आली. महाआरतीद्वारे या कार्यक्रमाची सांगता झाली या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून कराडातील दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 350 ढोल ताशा पथकासह 100 भगव्या ध्वजांची मानवंदना देण्यात आली. 
या दिमाखदार सोहळ्यासाठी हजारो कराडकर उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्यातील सुमारे 430 गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित शिवभक्ताना भगवा फेटा परिधान करण्यात आला शिवतीर्थावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली यावेळी 350 ढोल ताशा वादकांनी आपले वादन याठिकाणी सादर केले त्यानंतर महाआरती ने कार्यक्रमाची सांगता झाली  उपस्थितांनी  आपल्या जागेवर उभे राहून व प्रज्वलीत दीपपणती हातात घेऊन ही महाआरती केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी शिवतीर्थ परिसर दुमदुमून गेला होता डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा हजारो शिवभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला महाआरतीसाठी सुमारे 350 दाम्पत्यांनाविशेष निमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित महिलांचे ओटीभरण करण्यात आले. तसेच शिवप्रसादाचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.

दरम्यान कराडमधील भवानी तांडव, जगदंब, अप्टगंध, विजेता, रूद्र ब्रम्हांड, श्रीमंत भैरवनाथ या ढोल ताशा पथकांच्या वादकांनी याठिकाणी सहभाग घेतला होता.350 वादकांच्या ढोल वादनाने व शिवछत्रपतींच्या जयजयकाराने दत्त चौक परिसर अक्षरशः शिवमय झाला होता 



आमदार बाळासाहेब पाटील यांना विधिमंडळाची अपात्रतेबाबत नोटीस ; म्हणणे मांडण्यासाठी आठ दिवसाची दिली मुदत ;

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत त्यातील अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला जात आहे दरम्यान दुसऱ्या म्हणजेच शरद पवार गटाच्या आठ  आमदारांना विधिमंडळाने नोटिस पाठवली असून आठ दिवसात नोटीसीला उतर देण्याबाबतही सांगण्यात आले आहे यामध्ये कराड उतरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचेही नाव आहे

राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यामुळे सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर मकरंद पाटील दीपक चव्हाण हे तिघे  अजितदादा गटात सामील झाले आहेत तर
आमदार बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे व खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटात आहेत दोन्ही गटाकडून आमदारांना अपत्रतेबाबत नोटीस पाठवण्यात येत आहे अजित पवार गटाने आमदार बाळासाहेब पाटील यांना नोटीस बजावली आहे राष्ट्रवादीबद्दलचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे 30 ऑक्टोबर ला याबाबतचा निकाल येणे अपेक्षित आहे

पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आपणास अपात्र का करू नये  ?  अशी याचिका अजित पवार गटाने विधिमंडळ मध्ये दाखल केली होती या याचिकेवर म्हणणे मांडण्यास शरद पवार गटाच्या आमदारांना 8 दिवसाची मुदत देण्यात आली आहे

गुणरत्न सदावर्ते म्हणाले...जोरजबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही, मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये:

वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षणाची धग कायम असतांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त  वक्तव्य केले जात आहे. 'मराठा आरक्षणाचा वाद शरद पवार, उद्धव ठाकरेंनी उभा केला आहे.  जोर जबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही. मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये, असे वक्तव्य सदावर्ते यांनी केले आहे. वसईत विनोद भरणे यांच्या मुलीच्या विवाहासाठी सदावर्ते यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते. 

सदावर्ते म्हणाले,  मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पावर यांनी हा वाद उभा केला आहे.  येणाऱ्या काळात मराठा समाजातील बांधवांना कळेल  की आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणी आपली पोळी भाजत आहे. मराठा समाज आरक्षणात बसत नाही. मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होऊन जाण्याच्या  शोधण्याच्या भानगडीत पडू नये.

जोर जबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही : सदावर्ते
मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या विषयी बोलताना सदावर्ते म्हणाले, अरे गाडी फोडली तर आरक्षण मिळेल का? मला मारून टाकलं तर आरक्षण मिळेल का? तुम्हालाच आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही आरक्षण मागा पण जोर जबरदस्तीने केलेल्या  मागणीला भरताचे संविधान मान्यता देत नाही

गुणरत्न सदावर्तेंची मराठा समाजावर सातत्याने टीका
मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने समाजावर टीका करत होते. त्यामुळं मराठा समाज नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना बोलू नका, असाही इशारा देण्यात आला होता. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. त्यानंतर देखील सदावर्ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.  महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या सदावर्ते यांच्या विरोधात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. 

सदावर्ते नेमकं काय म्हणाले होते? 
“जरांगे पाटलांची सभा हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं, पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेंनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत,” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.

Saturday, October 28, 2023

मराठा आरक्षण आंदोलन तीव्र ; उद्या उपसमितीची बैठक ; सरकार ऍक्शन मोडवर...

वेध माझा ऑनलाइन।  मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असतानाच आता रविवापासून गावोगावी आमरण उपोषण करा अशी हाक मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे.

शनिवारी दिवसभरात विविध ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली. गेल्या तीन दिवसात एकूण सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत. गावबंदीचे लोणही वाढल्याने राजकीय नेते मंडळींचे धाबे दणाणले आहेत. काही नेतेमंडळीच्या वाहनांवर दगडफेकही झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडवर आले असून जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवारी मराठा आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या उपसिमितीची तातडीने बैठकही बोलावली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे.

३ दिवसांत ७ आत्महत्या
आरक्षणासाठी मराठवाड्यात तीन दिवसांत सात जणांनी आत्महत्या केल्या. अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी, जि. जालना), आपतगाव (छत्रपती संभाजीनगर), देवजना (ता. कळमनुरी, जि. हिंगोली), डोमगाव (जि. धाराशिव), गिरवली (ता. अंबाजोगाई, जि. बीड), ढाळेगाव (जि. लातूर) व उमरदरा (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) येथील समाजबांधवांनी आत्महत्या केल्या.

साखळी उपोषणाचे २९ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणात रूपांतर होईल.  
शासनाने आंदोलन सहज घेऊ नये. गावात नेत्यांना येऊ देऊ नका. तुम्हीही नेत्यांच्या दारात जाऊ नका. चर्चा करून कायमचा तोडगा जागेवर काढायचा असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ. मला बोलता येतेय तोवर चर्चेसाठी या. तुमचा रस्ता कोणी अडविला तर मी तिथे येईन. - मनोज जरांगे-पाटील

समंजसपणाची भूमिका घ्यावी
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोमवारच्या बैठकीतही काही निर्णय घेतले जातील. मनोज जरांगे-पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी समंजसपणा घ्यावा.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

जरांगेंनी सरकारशी चर्चा करावी
आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल आहेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन हमी दिली आहे. शपथ फळाला यावी म्हणून मी प्रयत्न करेन. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा करावी.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री


एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, आणि झालेच तर....फडणवीसांचे धक्कादायक विधान ; काय म्हणाले फडणवीस?

वेध माझा ऑनलाइन। आमदार अपात्र प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना कोर्ट समजते, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची व निवडणूक आयोगाची प्रत वाचली असेल, त्यावरून शिंदे हे अपात्र होऊ शकत नाहीत. परंतु, तो सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. शिंदे अपात्र झाले तरी काही अडचण नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतात.

दरम्यान  मराठा आरक्षणाच्या लढाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९८० साली मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली. १९८३ साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचा जीव त्यासाठी दिला. तेव्हापासून ही लढाई अजून तीव्र झाली. आज आम्ही ७० हजार उद्योजकांना ५ हजार कोटीचं कर्ज उपलब्ध केलं. त्याप्रमाणे २ लाख लोकांना रोजगार भेटले. मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या. याचा परिणाम असा झाला की, मराठा नेत्यांना त्यांच्या समाजाची लोक विचारू लागली की, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. म्हणून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे.

कोयना धरण परिसरात भूकम्पाचा सौम्य धक्का ;

वेध माझा ऑनलाइन। कोयनानगर परिसरामध्ये आज, शनिवारी रात्री ९ वाजून ४ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. २.९. रिश्टर स्केल इतकी त्याची तीव्रता होती.

या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ९.६ किलोमीटर अंतरावरील कोयना विभागातील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस होता. दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंची साथ सोडून पवारांचा जुना सहकारी पुन्हा स्वगृही ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. असे असताना शिवसेना शिंदे गटात काही महिन्यापूर्वी गेलेले शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा स्वगृही परतले आहेत. शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शहापूरमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा मजबूत झाली. सव्वा वर्षापूर्वी 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात फारसे काही पदरी पडले नसल्याने ते स्वगृही परतले आहेत. पण राष्ट्रवादीत परतून बरोरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केल्याचे बोलले जाते.

उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले. आमिषे, पोलिसांचा दबाव टाकून शिंदे गटाने आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी पळवले, असा आरोप ठाकरे गटाने वारंवार केला. एकनाथ शिंदे गटात दर आठवड्यात शिवसेनेसह इतर पक्षातून इनकमिंग जोरात सुरू असतानाच, शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाला रामराम करत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. एकेकाळी शिवसेनेचे आमदार असणाऱ्या दौलत दरोडा यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट न दिल्याने ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहत आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेले होते. त्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात फारसे काही पदरी पडले नसल्याने ते स्वगृही परतले आहेत. पण राष्ट्रवादीत परतून बरोरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केल्याचे बोलले जाते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले दौलत दरोडा आता अजित पवार गटात आले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदार संघात मोठाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि दौलत दरोडा यांचे पटत नाही. त्यामुळे जर युती झाली तर दरोडा यांच्यासाठी शिंदे गट प्रचार करतील का, हा सवाल उपस्थित होत आहे.

शहापूर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (आदिवासी) राखीव आहे. या मतदार संघात कॉंग्रेस चारवेळा, शिवसेना तीनदा, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोनदा निवडून आले तर एकदा शेतकरी कामगार पक्षाचा आमदार झाला तर एकदा अपक्ष आमदार निवडून आला आहे

इतिहास शहापूर विधानसभेचा
या मतदार संघात 1976 मध्ये अपक्ष पी.आर. पाटील निवडून आले. 1972मध्ये कॉँग्रेसचे श्रीरंग शिंगे विजयी झाले. 1978 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णकांत तेलंग आमदार झाले. 1980 ते 1990 असे सलग तीन वेळा कॉँग्रेसचे महादू बरोरा आमदार झाले. त्यानंतर 1995 ते 1999 मध्ये दौलत दरोडा हे शिवसेनेचे आमदार झाले. 2004 मध्ये महादू बरोरा आमदार झाले. यांनी या मतदार संघाचे नेतृत्व तीनदा कॉँग्रेसकडून तर एकदा राष्ट्रवादीकडून केलेले आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे दौलत दरोडा आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये पांडुरंग बरोरा आमदार झाले. 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट न दिल्याने दौलत दरोडा राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले.

आमदार अपात्रेसंदर्भात 30 ऑक्टोबर ला कोर्टात काय होणार ?

वेध माझा ऑनलाइन। आता एक मोठी बातमी आमदार अपात्रता प्रकरण संदर्भातील. सोमवारी म्हणजेच ३० ऑक्टोबरला या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची याचिका, अशा या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष कोणते नवे वेळापत्रक दाखल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अपात्रतेचे प्रकरण निकाली लावण्यासाठीचे वेळापत्रक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्याची सोमवारी अखेरची संधी आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष किती दिवसांत निर्णय घेतील, हे त्यांच्या वेळापत्रकावरून सोमवारी स्पष्ट होईल.

आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. पण, या प्रकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. एवढेच नाही तर हे प्रकरण वेगाने मार्गी लावावे, यासाठी ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण वेगाने निर्णय द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशी विनंती ठाकरे गटाने या याचिकेतून केली होती. पण यापूर्वीच्या दोन सुनावणींच्या वेळी विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक दाखल न केल्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर १७ ऑक्टोबरला रोजीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबरची डेडलाईन विधानसभा अध्यक्षांना दिली होती. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नवरात्र उत्सवाच्या काळात भेटून वेळापत्रक तयार करू, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली होती.

त्यामुळे त्यांचे वेळापत्रक तयार झाले आहे का, आणि ते सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाची याचिका आहे तशीच याचिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार गटाचीही आहे. या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी आहे. दोन्ही याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने जून २०२२ मध्येच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा ११ मे २०२३ रोजी निकाल लागला. त्यात आमदार अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. पण मे २०२३ पासून विधानसभा अध्यक्षांनी यात लक्ष न घातल्याचा आरोप करत हे प्रकरण वेगाने निकाली काढावे, यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर यंदा २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ८ आमदारांनीही शपथ घेतली होती. त्यामुळे शरद पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

आरक्षणाचे गौडबंगाल ; काय म्हणाले मंत्री रामदास आठवले ...?

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापत आहे. मराठा नेते मंडळींना गावबंदी करण्यात आलेली आहे. असे असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘2011 च्या जणगनणेनुसार अनुसुचित जातीची लोकसंख्या 16.6 टक्के आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या 8. 4 टक्के अशी दोन्हीची मिळुन 25 टक्के लोकसंख्या आहे. तसेच ओबीसीची लोकसंख्या कालेलकर आयोगांनुसार 52 टक्के आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी यांची लोकसंख्या 77 टक्के होते, मात्र त्यांना आरक्षण 49.50 टक्के मिळते. तसेच उर्वरित जनरल कॅटेगरीची लोकसंख्या 23 टक्के होत असून त्यांना 50. 50 टक्के जागा खुल्या वर्गासाठी मिळतात.’ हे आरक्षणाचे गौडबंगाल त्यांनी मांडले आहे.

शिवाय, ‘ज्या जाती एससी, एसटी, ओबीसीमध्ये येत नाहीत त्या जातींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षापुर्वीच 10 टक्के ई.डब्लु.एस.चे आरक्षण दिले आहे.’ असेही रिपब्लिकन रामदास आठवले यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात 10 लाख सरकारी नोकरी देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून आज देशभरात 41 हजार जणांना सरकारी नोकरी देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात प्रधानमंत्री रोजगार मेळावा अंतर्गत 200 हुन अधिक जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी, डी.आर.एम. रजनीश गोयल आदी उपस्थित होते.

रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असते. रेल्वे ही लोकांची जीवनवाहीनी झालेली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या  लोकांची संख्या अधिक आहे. रेल्वे तिकीटांत वेटींग लिस्ट (प्रतिक्षा यादी) अधिक असते. तिकीट काढणाऱ्या  प्रत्येक प्रवाशाला वेटींगवर न ठेवता त्याला आसण व्यवस्था रेल्वेने दिली पाहिजे. त्यासाठी रेल्वेने डबे वाढविले पाहिजेत आणि सीट सुध्दा वाढविल्या पाहिजेत. रेल्वेच्या इंजिनात जेवढी क्षमता त्यानुसार रेल्वेने डबे वाढवून तिकीट काढणाऱ्या  प्रवाशांची आसन व्यवस्था करुन दिली पाहिजे अशी सूचना यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

शरद पवारांनी शेतकऱ्यांना फसवले आणि दिशाभूल करून वेठीस धरले ; भाजपची पवारांवर टीका ;

वेध माझा ऑनलाइन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. “शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना काय केले असा थेट सवाल त्यांनी सभेत विचारला होता. त्यावर, शरद पवार यांनी शनिवारी (28 ऑक्टोबर) मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन कृषिमंत्री असताना केलेल्या कामांची यादीच सादर केली. यावरून, भाजपनेही पवारांना प्रत्युत्तर दिले असुन “खोटे बोला पण रेटुन बोला,” अश्या शब्दांत टिका केली आहे. इतकेच नव्हे, तर “खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवले दिशाभूल करून वेठीस धरले अशीही पवारांवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या पाठीशी शेतकरी 2014, 2019 पाठीशी राहिला आहे 2024 ला देखील पाठीशी ठामपणे उभे राहणार,” असे म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या अधिकृत “X” अकाऊंटवरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ह्या ट्विटमधून शरद पवार यांच्यावर टिका करताना 2014 आणि 2022 मधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळालेल्या हमीभावाची यादीही सादर केली आहे.

भाजपा महाराष्ट्रने ट्विट केले आहे की, “खोटं बोला पण रेटून बोला अशी भूमिका मा.शरद पवारांनी घेतलेली दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे मात्र शरद पवारांनी नेहमीच शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम केले आहे. पवारांना आरसा दाखवणे गरजेच आहे.”

“स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे काम मोदी सरकारच्या कार्यकाळात झाले.”

शेतकऱ्यांचा शेतमालाला मिळालेला MSP
तांदळाला 2014 साली 1310 रुपये तर 2022 मध्ये 2040 रुपये इतका भाव मिळत होता. तर गव्हाला 2014 मध्ये  1400 रूपये तर 2022 मध्ये 2015 रुपये इतका भाव मिळत होता. सोयाबीन पिकाला 2014 मध्ये 2560 रुपये तर 2022 मध्ये 4300 रुपये इतका भाव मिळत होता, हे ट्विटमधून सांगितले आहे.

मोदी म्हणाले... पवारांनी कृषिमंत्री असताना काय काम केलं? पवार म्हणाले...हे घ्या उत्तर... ; वाचा बातमी ;

वेध माझा ऑनलाइन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, (26 ऑक्टोबर} शिर्डी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी थेट शरद पवार यांनाच लक्ष्य केले. ‘कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा थेट सवाल मोदींनी केला. त्यावर, शरद पवार यांनी आज शनिवारी, (28 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिले. ‘पंतप्रधान हे पद ही एक संस्था असून संस्थेची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे मला समजतं. या पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली. ती वास्तवापासून दूर असेल तर त्याचं चित्र समोर मांडावं यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे,’ असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यावेळी म्हणाले, “2004 ते 2014 या काळात मी देशच्या कृषिमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली. 2004 साली जेव्हा कृषिमंत्री झालो, तेव्हा देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यावर पहिल्या दिवशी मला कटू निर्णय घ्यावा लागला. भारताला अमेरिकेकडून गव्हाची आयात करावी लागत होती आणि ही अस्वस्थ बिकट करणारी होती. त्या गहू आयातीच्या फाईलवर दोन दिवस मी सही केली नाही. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे त्याकाळी गरजेचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्यावेळी अन्नधान्य, डाळी यांच्या हमी भावात भरीव वाढ करण्याचे ठरवले. हा निर्णय घेतला नसता तर स्थिती बिघडली असती याची माहिती मनमोहन सिंग यांनी मला दिली.”


कृषिमंत्री असताना आणल्या अनेक योजना
“2004 ते 2014 या माझ्या कार्यकाळात तब्बल एका दशकात गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांच्या हमी भावात दुप्पटी पेक्षा अधिक वाढ करण्यात आली. अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची सुरूवात मी कृषिमंत्री असताना करण्यात आल्या. UPA सत्तेत असताना शेती आणि संलग्न क्षेत्रात सर्वंकष बदल घडवण्याच्या दिशेने अतिशय व्यापक, दूरगामी योजना सुरू करण्यात आल्या. यापैकी NHM आणि RKVI या दोन योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, देशाच्या कृषिक्षेत्राचा चेहरा मोहरा या योजनांमुळे बदलला,” असे ते पुढे म्हणाले.

यावेळी, शरद पवार यांनी आकडेवारी सादर करत 2004 ते 2014 या काळात गहु, तांदूळ, कापूस, सोयाबीन यांसारख्या सर्व पिकांच्या हमीभावात दुपटीने वाढ केली गेली. अन्नधान्याच्या हमी भावात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. भारत जगामध्ये तांदळाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश झाला तर गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला. ऊस, कापूस, ज्यूट, दूध, फळे, मासे आणि भाजीपाला यांच्या उत्पादनात देखील भारत पहिल्या – दुसऱ्या क्रमांकावर राहिला. फळांचे उत्पादन 45.2 दशलक्ष टनांवरून 89 दशलक्ष टनांपर्यंत गेले. पालेभाज्यांचे उत्पादन 88.3 दशलक्ष टनांवरून 162.9 दशलक्ष टनांपर्यंत वाढले.

संजय राऊत म्हणाले......तर अजितदादांनी मंचावरून उठून जायला हवं होतं...मोदींनी एकनाथ शिंदे अजितदादांना गुलाम बनवलं आहे ;

वेध माझा ऑनलाइन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. याला शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मोदींना विसरण्याचा आजार झाला आहे का?”, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. तसेच पंतप्रधान पदावर असताना मोदींना असं बोलणं शोभत नाही, असंही म्हटलं. ते शनिवारी (२८ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते...दरम्यान “मोदींनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना गुलाम बनवलं आहे. त्यांच्यापेक्षा गुलाम बरे आहेत. मोदींनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर अजित पवारांनी मंचावरून उठून निघून जायला हवं होतं.  असंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपर्यंत म्हणत होते की, शरद पवार त्यांचे गुरू आहेत. ते त्यांचं बोट पकडून राजकारणात आले आहेत. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा कृषीमंत्री शरद पवारांनी त्यांना खूप मदत केली. हे सर्व मोदींचेच वक्तव्ये आहेत. मोदींना विसरण्याचा आजार झाला आहे का?”

मोदींना विसरण्याचा आजार असेल, तर त्यांनी…”
“मोदींना विसरण्याचा आजार असेल, तर त्यांनी उपचार करून घ्यावेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. असं बोलणं त्यांना शोभत नाही. मोदी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करतात. जे राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात त्या पक्षांच्या नेत्यांवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर मोदी चिखलफेक करत आहेत. हे योग्य नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

अजित पवारांनी मंचावरून उठून निघून जायला हवं होतं”
“मोदींनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना गुलाम बनवलं आहे. त्यांच्यापेक्षा गुलाम बरे आहेत. मोदींनी शरद पवारांवर ती टीका केल्यानंतर अजित पवारांनी मंचावरून उठून निघून जायला हवं होतं. मोदींनी आज शरद पवारांवर ही टीका केली, उद्या ते बाळासाहेब ठाकरेंविषयीही असंच बोलू शकतात,” असंही राऊतांनी नमूद केलं.


शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप केले जात नाही ; काळाबाजार कारणाऱ्या दुकानदारांची चौकशी करा , अन्यथा आंदोलन करणार ; प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते मनोज माळी यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। राज्य शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानच्या माध्यमातून प्रती लाभार्थी व्यक्तीला ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र, कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप केले जात नसून यामध्ये काळाबाजार केला जात आहे. काळाबाजार कारणाऱ्या दुकानदारांची चौकशी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा थेट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते मनोज माळी यांनी तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे दिला.

मनोज माळी यांच्यावतीने काल शुक्रवारी तहसीलदार विजय पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिव शिवाजी चव्हाण, अशोक पवार, प्रवीण शिंदे, बंटीभाऊ मोरे, श्रीकांत यादव, जयवंत मोरे, विशाल दबडे, प्रफुल खरात, आशुतोष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 यावेळी मनोज माळी म्हणाले की, राज्य शासनाकडून कमी धान्य पुरवठा झाल्याचे सांगत स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थीने कमी धान्य देत आहेत. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांना विचारले असता तालुका पुरवठा विभागाचे सूचनेप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत असल्याचे सांगत आहेत तसेच वाटप केलेल्या धान्याची पावती देत नाहीत.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची येत्या पंधरा दिवसात सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आपल्या दालनासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे माळी यांनी निवेदनाद्वारे म्हंटले आहे.

20 कोटी द्या, अन्यथा जीवे मारू ...मुकेश अंबानी याना ई मेलद्वारे धमकी ; पोलीस यंत्रणा अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन । देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानींकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न मिळाल्यास जीव घेऊ असं अंबानींना धमकावलं आहे. त्यामुळे मुकेश अंबानींची सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात आयडीवरून ईमेल मिळाला आहे. त्यात मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलंय की, If you don’t give us 20 Crore rupees, we will kill you, we have the best shooter in India’ हा ईमेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३८७, ५०६(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

मी माझ्या पगारावर समाधानी आहे ; साताऱ्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या फलकाची चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन। सरकारी काम सहा महिने थांब अशी परिस्थीती महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पाहायला मिळते. शहर असो वा खेडेगाव या ठिकाणी सरकारी अधिकारी आपल्या कामाचा मोबदला पगारापेक्षा टेबलाखालून अधिक मिळवतात. बरेच सरकारी अधिकारी मलाई खातात. आणि हे सत्य देखील आहे. सरकारी अधिकारी आणि दलाल यांच्यात अधिक गट्टी असते. याचा फयदा दलालासही होतो. त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी गोरगरीबांकडून गरजेपेक्षा अधिक पैसे घेतात. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र यावर आता सातारा येथील गटविकास अधिकाऱ्याने सरकारी काम आणि प्रामाणिकपणा या दोन्ही बाबी सोबत घेऊन भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना शिकवण दिली आहे. आपल्या दालनासमोर ‘मी माझ्या पगारावर समाधानी’ असल्याचा फलक लावला आहे. याची चर्चा सुरू आहे.

दलालांचे धाबे दणाणून सोडले
कुणी तलाठी, तहसिलदारांचा दूरध्वनी क्रमांक द्यायचा म्हटले तरीही काही शिपाई मागे पुढे पाहतात. हजारदा पंचायत कार्यालयात गेलो तरीही आजचे उद्या, उद्याचे परवा सामान्यांना नुसतीच पायपीट करावी लागते. यावेळी एखादे काम लवकर होत नसल्याने दलालास हाताशी धरून सरकारी अधिकारी काम करतात. टेबलाखालून मलई मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शिकवण म्हणून आता सातारा येथील गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी आपल्या दालनासमोर मी माझ्या पगारावर समाधानी आहे. अशा आशयाचा फलक लावला आहे. देशात राज्यात कुणीच कधी आपल्या पगारावर बोलत नाही. मात्र अधिकारी सतिश यांनी समाजिक भावना लक्षात घेवून सामान्यांचे भले आणि दलालांचे धाबे दणाणून सोडले आहेत.

मी माझ्या पगारावर समाधानी
सतिश बुद्धे नवनिर्वाचित अधिकारी हे मुळचे लातूर विभागातील असून (७ ऑक्टोबर) सातारा येथे गटविकास अधिकारी पदावर कामाची धुरा सांभाळली आहे. यांनी यांच्या सरकारी दालनासमोरच एक फलक लावला आहे. या फलकाची चर्चा अनेक ठिकाणी होऊ लागली आहे. या फलकावर सतिश यांनी मी माझ्या पगारावर समाधानी आहे. अशा आशयाचे मत लिहले आहे. याचसह त्यांनी मी दैऱ्यावर असताना भेटु शकलो नाही तर खालील दिलेल्या क्रमांकावर निवेदन, तक्रारी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर नाव, गावासह, मोबईल क्रमांक नमूद करावा) असे त्यांनी आपल्या फलकावर नमूद केले आहे.

सातारकरांनी खात्री बाळगावी
कार्यालयात माझ्याप्रती कोणतेही गैर काम होऊ नये. यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून काम करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा आहे. अधिक माया जमवायची इच्छा नाही. जे योग्य काम आहे, ते मार्गी लावणारच सातारकरांनी खात्री बाळगावी, असे सरकारी अधिकारी सतिश बुद्धे म्हणाले आहेत.

Friday, October 27, 2023

कराडच्या कॉटेज हॉस्पिटल येथे नवरात्रीच्या काळात जन्म घेतलेल्या मुलीं व त्यांच्या मातांचा इनरव्हिल क्लब ऑफ कराडच्यावतीने सत्कार ; अध्यक्षा सौ सीमा पुरोहित यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन । कराडमधील वेणूताई उपजिल्हा रुग्णालय येथे नवरात्रीच्या काळात  जन्म घेणाऱ्या 13 मुलींचा व त्यांच्या मातांचा इनरव्हिल क्लब ऑफ कराडच्या वतीने बेबी किट देऊन तसेच त्या बालकांच्या मातांना साडी व पोषक आहार देऊन सत्कार करण्यात आला अशी माहिती इनर्व्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा सौ सीमा पुरोहित यानी दिली आहे 

यावेळी सदर उपक्रमाबाबतची माहिती क्लबच्या एडिटर रूपाली डांगे यांच्या वतीने  देण्यात आली त्याठिकाणी उपस्थित मातांची नावे अनुराधा टकले यांनी वाचून दाखवली.या उपक्रमासाठी वेणूताई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेडगे सर तसेच जानकर मॅडम, सायरा सिस्टर  आणि इतर स्टाफ यांनी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा सौ सीमा पुरोहित, सचिव डॉ अर्चना औताडे, ट्रेझरर शितल शहा, ISO नम्रता कंटक, एडिटर रूपाली डांगे, व्हाईस प्रेसिडेंट  मंजुषा इंगळे, CC अनुराधा टकले, रुता चाफेकर, अंजली नावडीकर, श्रावणी घळसासी, अनुराधा पवार, आदिती पावसकर, पद्मजा इंगळे, सुजाता बेंद्रे, अश्विनी शेवाळे, मीरा गांधी,वासंती राजोपाध्ये उपस्थित होत्या.