वेध माझा ऑनलाइन। ईद-ए-मिलाद निमित्त रविवारी कराड शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत 25 घोडे व सजवलेल्या रिक्षा अन्य वाहने घेऊन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाही जामा मस्जिद येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक जामा मस्जिद येथून भाजी मंडई दर्गा मोहल्ला चावडी चौक आझाद चौक मार्गे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने दत्त चौकात गेली तेथून कामगार चौकात जनता बँक महात्मा ज्योतिराव फुले चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक जोतिबा मंदिर कन्या शाळा दर्गा मोहल्ला मार्गे काढून जामा मस्जिद येथे मिरवणुकीची सांगता झाली.
मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचा जयघोष करण्यात आला.
महमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून कराड शहरातील प्रमुख चौकात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मक्का मदिनाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली लहान मुले युवक यांचा मिरवणुकीतील सहभाग लक्षवेधी होता.
जामा मशीद येथे मौलाना यांच्याकडून दुवा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पैगंबर जयंती उत्सव कमिटीतील सर्व पदाधिकारी सदस्य व कराडवासीय या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी जयंतीच्या पार्श्वभूमीवर चौक बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment