वेध माझा ऑनलाइन। उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानामुळे भाजपकडून ते स्वतः लोकसभेचा उमेदवार म्हणून असणार का ? याबाबत शंका व्यक्त होत आहे तसेच त्यांनी यापुढील निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले का? अशीही आता चर्चा होत आहे
सातारा येथे माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी माझी निवडणूकीची खाज भागली आहे... बघता बघता मी 50 चा कधी झालो, कळले नाही, रिटायरमेंटचे वय राजकारणातही पाहिजे. असे विधान केल्यामुळे त्यांच्याबाबत वरील चर्चांना उधाण आले आहे.
उदयनराजे म्हणाले रिटायरमेंटचे वय राजकारणातही पाहिजे. राजकारणात प्रत्येकजण म्हणतो तरूणांना वाव दिला जावा... आणि त्या लोकांचं उत्तर पुढे काय असतं..,तर, लोकांचा आग्रह होता म्हणून मला नाही म्हणता आलं नाही... असा टोलाही राजेंनी शरद पवारांचे नावं न घेता यावेळी लगावला ...
पवारांना दिला सल्ला...
शरद पवारांची आता मार्गदर्शक म्हणून भूमिका असावी असे मला वाटते. त्यांनी मुख्यमंत्री केंद्रात सर्व भोगले, त्यांनी आता मार्गदर्शक भूमिकेत असले पाहिजेत.अनुभव हा मोठा गुरू असतो, त्यामुळे शरद पवारांचा अनुभव पाहता, त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं योग्य वाटतं. असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment