Thursday, October 12, 2023

एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर…”; संजय गायकवाडांच्या विधानावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया ; काय म्हणाले...? वाचा सविस्तर...


वेध माझा ऑनलाईन। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. 'मातोश्री'वरून या कटाची सूत्रं हलली, असा थेट आरोप शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. आमदार गायकवाड यांच्या आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत विरोधकांवर प्रहार केला आहे.

'आमदार संजय गायकवाड यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. ही बाब खरी असेल तर ती फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. ही माहिती सत्य असेल तर ती पोलिस आणि तत्सम यंत्रणेकडून तपासली गेली पाहिजे,' असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
'कार्यकर्ता आणि नेता यांच्यात एक जिवाभावाचे नाते असते. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार म्हणजे या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार आहे,' असा आरोपही कडूंनी केला. 'एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जर ही घटना घडली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा कलंक लागला असता,' असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment