Tuesday, October 3, 2023

सत्तेवर येण्याची खात्री नाही म्हणून सरकार निवडणुका घेत नाही ; आ बाळासाहेब पाटील यांची टीका ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका नगरपालिका यांवर प्रशासक आहेत, सरकार निवडणूक घेण्याचे धाडस करत नाही. सरकार कोणत्या मार्गाने आले आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे. निवडणुका घेतल्या तर सरकारला सत्तेवर येण्याची खात्री नसल्याने  निवडणूका न घेता त्या पुढे ढकलल्या जात आहेत अशी टीका आमदार बाळासाहेब पाटील यांनी शहापूर (ता.कराड) येथे त्यांच्याच प्रयत्नांने मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी केली. 

कोयना भूकंप विकास निधीतून आत्माराम जाधव यांचे घर ते महादेव मंदिरापर्यंतचा रस्ता डांबरीकरणं कामांचे भूमिपूजन. आमदार स्थानिक विकास निधी व २५१५ व इतर ग्रामीण विकास निधीतून सामाजिक सभागृह बांधणे व विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले. 

कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे, माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे, पै. संतोष वेताळ, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव प्रमुख उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार स्थानिक विकास निधी, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध रस्ते, उंच पूल, अंगणवाड्या, शाळा खोल्या, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सिमेंट बंधारे पाझर तलाव, अभ्यासिका हॉल, आरसीसी गटर्स, फ्लेवर ब्लॉग्स, स्मशानभूमी सुशोभीकरण, विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांचा विकास आदी विकास कामाच्या माध्यमातून कराड उत्तरच्या सर्वांगीण विकास केला आहे, राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याचे संपूर्ण अधिकार संबंधित विधानसभा सदस्यांना असतो. मात्र, दुर्दैवाने सत्तारूढ पक्षाचे गाव पुढारी श्रेय दाखवतात. देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, सुहास बोराटे यांनीही मार्गदर्शन केले. संभाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच अनिता दीपक मदने यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment