Wednesday, October 11, 2023

यावर्षीचा सर विश्वेश्वरैय्या पुरस्कार निवृत्त अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर : कराड आर्किटेक्टस & इंजिनिअर्स असोसिएशनची घोषणा : वाचा बातमी सविस्तर:

वेध माझा ऑनलाइन। कराड आर्किटेक्टस & इंजिनिअर्स असोसिएशन च्या वतिने अभियंता दिनानिमित्त यावर्षीचा दिला जाणारा सर विश्वेश्वरैय्या पुरस्कार केसे ता.कराड येथील निवृत्त अभियंता आबासाहेब पांडुरंग शिंदे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी आज संगम हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. हा पुरस्कार सोहळा 13 ऑक्टोंबर रोजी स्व. वेणूताई चव्हाण स्मारक येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे 

याबाबत माहिती देताना अध्यक्ष श्रीकुलकर्णी म्हणाले की, या होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात समृद्धी महामार्गाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याबाबत मुख्य अभियंता एस के सुरवसे व अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते हे मार्गदर्शन करणार आहेत. 

या सोहळ्यास खा. श्रीनिवास पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, पालकमंत्री शंभुराज देसाई,  कृष्णाचे डॉ सुरेश भोसले, सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशील कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेस आर्किटेक्टस & इंजिनिअर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष दिग्विजय जानुगडे, खजिनदार चंद्रकांत पोळ, सेक्रेटरी अमित उंब्रजकर, संचालक  प्रतीक जाधव, धैर्यशिल यादव, रोहित शर्मा, क्षितीज बेलापुरे, अजिंक्य पाटील किशोर साळुंखे, मिलींद पाटील, मकरंद जाखलेकर, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment