वेध माझा ऑनलाइन। पुण्याच्या वन विभागाने हजारमाची ता. कराड येथील एका घरावर सोमवारी छापा टाकला. त्यावेळी घरात भेकर व हरणांची शिंगे तसेच बिबट्याची कातडी आढळून आली आहेत वन विभागाने त्या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत जाधव आणि अभिजीत जाधव (मूळ गाव हजारमाची) यांचे पुण्यातील खडकवासला धरणालगत फार्म हाऊस आहे.त्या हाऊसमध्ये शिकार केलेला बिबट्या ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभाग पथकाने त्याठिकाणी छापा टाकून तेथून बिबट्याच्या नख्यांसह पंजे जप्त केले. त्याप्रकरणी विश्वजीत जाधव आणि अभिजित जाधव या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. संबंधित संशयीतांचे मुळगाव हजारमाची आहे. त्यामुळे पुण्याचे वनाधिकारी सपकाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने सोमवारी हजारमाचीत जाधव यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना हरण व भेकराची शिंगे बिबट्याचे कातडे अशा वस्तू सापडल्या आहेत वनविभागाने या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत
No comments:
Post a Comment