Saturday, October 7, 2023

पत्रकारांना उद्धटपणे उत्तर देणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदांवर पत्रकारांचा बहिष्कार ;

वेध माझा ऑनलाइन। सातारा येथे जिल्हा शासकीय क्रांतीसिह नाना पाटील रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेवेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यात व प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींच्यामध्ये वादावादीचे घटना घडली. शंभूराजे देसाई यांनी शुक्रवारी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीच हुज्जत घातली. प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही असे उत्तर दिले. त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधील नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय साताऱ्यात पत्रकारांनी घेतला आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पत्रकार परिषदांमध्ये आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून हे योग्य नसल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. कोणत्याही पत्रकार परिषदेला वेळेवर न पोहचणे, पत्रकारांना वाट पहात थांबविणे, पत्रकार परिषदेच्या वेळांमध्ये सतत बदल करणे असे त्यांचे प्रकार सुरुच आहेत.

पत्रकारांशी बोलताना ‘आपल्याला माहिती नाही. माहिती घ्या आणि बोला. अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलू नका, असे ते बोलत असतात  मुळात त्यांनाच अनेक प्रश्नांची माहिती नसते. त्यांची माहिती अपुरी असल्यामुळे त्यांना उत्तर देता येत नाही त्यामूळे त्यांच्या अशा उद्धट उत्तरे देण्यामुळे पत्रकारांनी आता त्यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय साताऱ्यात घेतला आहे. 

No comments:

Post a Comment