सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 97 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 72 आणि महाबळेश्वरला 155 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. मागील 3 आठवड्यापासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, कोयना धरणात सध्या 20.04 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागल्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. दि. 1 जूनपासून कोयनेला 843 आणि महाबळेश्वरमध्ये 863 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
No comments:
Post a Comment