Thursday, July 11, 2024

खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊ नये म्हणून आ. जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या ; अनिल देसाईंनी केला गौप्यस्फोट

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच माण तालुक्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फ़ैरी झाडू लागल्या आहेत. या दरम्यान, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा गटाचे नेते अनिल देसाई यांनी साताऱ्यात भाजप आ. जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊ नये म्हणून आ. जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या. उदयनराजेंचं तिकीटं मिळू नये, त्यांची उमेदवारी अडचणीत आहे, असे आमदार गोरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी भाजपला सांगितले असे देसाई यांनी म्हंटले आहे

अनिल देसाई यांनी साताऱ्यात नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी देसाई यांनी आमदार गोरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. यावेळी देसाई म्हणाले की, “आम्ही काबाडकष्ट करून, व्यवसाय करून पैसे कमावलेत, तुमच्यासारख्या चोऱ्या, लांड्यालबाड्या करून पैसे कमवले नाहीत अशांनी आमची मापे काढू नयेत, गोरे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, त्यांना एवढंच सांगतो की आता लोकसभेला ट्रेलर बघितलाय, आता विधानसभेला पिक्चर दाखवणार आहोत. त्यांना तीन महिन्यावर आमदार राहू देत नाही,” असे आव्हान अनिल देसाई यांनी केले.
जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला सांगितले की, मी ज्या उमेदवाराला सांगतोय त्याला जर उमेदवारी दिली तर त्याला निवडून आणायची जबाबदारी माझी अशी पक्षश्रेष्ठींसमोर कबुली दिली होती तसेच हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभा राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गोरेंनी शब्द दिला होता असा दावा अनिल देसाईंनी केला आहे. यावर पुढे अनिल देसाई म्हणाले तुम्ही दिलेला खासदार तर पडलायचं पण तुमच्यामुळे महाराष्ट्रातील बरेचसे खासदार पडले आहेत. तुम्हाला भाजपने चांगले ओळखले आहे. आता तरी फडणवीसांना दिलेला शब्द पाळणार का?, असा सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.


No comments:

Post a Comment