Friday, July 12, 2024

दारू घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल याना कोर्टाचा मोठा दिलासा;

वेध माझा ऑनलाइन।
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खत्रा आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने 17 मे रोजी केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.

आज 12 जुलैरोजी याबाबत निर्णय देण्यात आला. आज कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची शिफारस केली आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही केजरीवाल यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर
त्यांना सीबीआयकडूनही अटक झाली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.सुनावणी पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय.
केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी जामीन मंजूर करत हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश दिले.
सीबीआय प्रकरणी 18 जुलैरोजी होणार सुनावणी
तसेच जोपर्यंत मोठे खंडपीठ निर्णय घेत नाही तोपर्यंत केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत.
केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय प्रकरणी 18 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल.



No comments:

Post a Comment