Thursday, July 11, 2024

गणपतराव गायकवाड जेलमध्ये तर शहाजीबापू रुग्णालयात: महायुतीचं गणित बिघडणार !

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज (12 जुलै) मतदान होणार आहे. 11  जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं एका एका आमदाराचं मत महत्वपूर्ण असणार आहे. अशात महायुतीसाठी एक चिंतेची माहिती समोर आली आहे.

पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. कॉँग्रेसने गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखावं, असं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील रुग्णालयात आहेत.

शहाजीबापू पाटील हे आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आज ते मतदान करायला येणार की नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. मविआ नेत्यांनी जो न्याय अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना लावण्यात आला त्या प्रमाणं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनाही यावेळी मतदान करु देऊ नका, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीची चिंता वाढली आहे.

दरम्यान, राज्याच्या विधानसभेत सध्या 274 आमदार असून विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेवर 11 आमदार निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत विजयी उमेदवाराचा कोटा 23 इतका निश्चित करण्यात आलाय. आता शहाजीबापू हे मतदानाला येणार का?, गणपत गायकवाड यांना मतदान करू दिले जाईल का?, याबाबत सर्वांच्या नजरा लागून असतील.



No comments:

Post a Comment