मुंबई वरळी हिट अँड रन प्रकरणाने रान पेटलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वरळी येथे झालेल्या अपघातात मराठी महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं आहे. अंमली पदार्थाचे सेवन होत असल्याने असले प्रकार घडताना दिसतात. मात्र अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी गांजा तस्करी रॅकेटमध्ये सापडल्या आहेत. त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
लक्ष्मी ताठे असं त्यांचं नाव असून तेलंगणा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे. तेलंगणाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील महिन्यात 190 किलोचा गांजा पकडला होता. या दोघांकडून लक्ष्मी ताठे यांचं नाव समोर आलं आहे.
एका महिन्यानंतर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करत लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आली होती. नाशिकच्या पंचवटी येथील परिसरातून पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. लक्ष्मी ताठे यांची पक्षातून याआधी हकलपट्टी करण्यात आली असल्याने त्यांचा आणि शिवसेनेचा कोणताही संबंध असणार नाही असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी केलं.
तेलंगणा राज्यातील दामोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 8 जून 2024 रोजी पोलिसांनी 190 किलो गांजा पकडला होता. या प्रकरणात पोलिसांनी शोध घेतला आहे. अशातच बीड आणि अहमदनगरच्या दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे. याप्रकरणात लक्ष्मी ताठेचं नाव समोर आलं आहे. पोलिसांनी संपूर्ण माहिती घेत आता तिच्यावर कारवाई केली. याप्रकरणी आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
लक्ष्मी ताठे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विलास शिंदेंनी केली. तेलंगणा पोलीस नाशिकमध्ये येऊन ड्रग्स माफियांवर कारवाई करत असतात. नाशिक पोलिसांना याबाबत कोणताही तपास नव्हता का? असा सवाल त्यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment