Thursday, July 11, 2024

शरद पवारांचा भाजपला दे धक्का ; भाजपचा मोठा नेता पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार ;

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला चांगलाच धक्का दिला. मविआने राज्यात छाप सोडली. आता सर्वांचं लक्ष हे विधान सभेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महायुतीला धक्क्यावर धक्के देत आहेत.

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे भाजपला मोठा धक्का बसला. अशात भाजपचा अजून एक नेता हा शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राजीनामा
भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिलाय. आता ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. सुधाकर भालेराव यांच्या राजीनाम्यानंतर  आता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. आज 11 जुलैरोजीच ते शरद पवार गटात जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.

भाजपचा माजी आमदार शरद पवार गटात जाणार?
यापूर्वी अहमदपूर या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. अशात सुधाकर भालेराव यांनीही प्रवेश केला तर लातूर जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील. यामुळे पवार गटाची ताकत तर वाढेल पण भाजपला हा मोठा धक्का मानला जाईल.
मराठवाड्यात भाजपसाठी हा दूसरा मोठा धक्का मानला जाईल. राजकीय वर्तुळात सध्या सुधाकर भालेराव हे राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षातून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे.



No comments:

Post a Comment