Thursday, July 11, 2024

काँग्रेसचे आमदार क्राॅस व्होटिंग करणार ! जयंत पाटील यांनी थेट 'त्या' आमदारांकडे बोट दाखवलं?काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्या (12जुलै) महायुती महाविकास झटका देणार की महाविकास आघाडी लोकसभेतील दबदबा कायम ठेवणार? याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने 12 वा उमेदवार कोणाचे बारा वाजवणार याची सुद्धा चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पाठिंबा असलेले उमेदवार तथा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्राॅस व्होटिंग करणार असल्याचा दावा केला आहे. 

काँग्रेसकडील मते क्रॉस व्होटिंग होणार
ती तीन ते चार मते वगळून मी जिंकून येणार असल्याचा दावा सुद्धा जयंत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे धाकधूक दिसते का? दिसणारच नाही. कारण आमच्या तिन्ही उमेदवारांना पूर्ण निवडून येणार असल्याचा विश्वास आहे. आमच्याकडे क्रॉस वोटिंग होणार नाही. काँग्रेसकडील तीन ते चार मते क्रॉस वोटिंग होणार आहेत. ती आम्ही सोडलीच आहेत. ते फक्त नावालाच काँग्रेसमध्ये असल्याचे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्या मतांना सोडून दिलं आहे.  जयंत पाटील यांनी शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. त्या संदर्भात मला मत द्या, असं मी कोणालाही बोलले नाही. कारण मला विश्वास आहे की माझी मत माझ्यासोबत आहेत. 

काँग्रेसचे ते चार उमेदवार कोण?
दरम्यान, काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचा दावाच शेकापचे जयंत पाटील यांनी केल्यानंतर ते आमदार कोण? याचीच चर्चा रंगली आहे. ही चर्चा रंगल्यानंतर अर्थातच नांदेड जिल्ह्यातील आमदारांकडे लक्ष गेलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नांदेडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. 

त्यामुळे आता खासदारकी मिळाल्याने अशोक चव्हाण यांना आता समर्थक आमदारांची कोणत्याही परिस्थितीत मते खेचण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या निशाण्यावर अशोक चव्हाण नाहीत ना? अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण समर्थक आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन अण्णा हंबर्डे आणि जितेंद्र अंतापूरकर हे आमदार भाजपला मतदान करतील, अशी चर्चा आहे. 


No comments:

Post a Comment