वेध माझा ऑनलाइन - पिस्तूलचा धाक दाखवून 35 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी दौंड येथील माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शेख असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. या सगळ्या प्रकरणात त्याच्यासह एकून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तक्रारीत म्हटल्यानुसार, वसीम बादशहा शेख याने पीडितेला घरी बोलावून पिस्तुल दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतरही अनेकदा पिडीतेवर बलात्कार केला. या सगळ्याला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 22 ऑगस्ट 2022 या दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.
आरोपी दोघांसह कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, वसीम बादशहा शेख याच्यासह बादशहा आदम शेख आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांवर, असं एकूण सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा माजी गटनेता असलेला बादशहा शेख आणि त्याचा मुलगा वसीम शेख हे संशयित आरोपी विनयभंग, प्राणघातक हल्ला आणि अॅट्रोसिटी प्रकरणात सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
वसीम खान आणि त्याच्या पत्नीनं गुंगीचं औषध दिलं
पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पीडितेला लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला वसीमची पत्नी घेऊन गेली होती. तिथे गेल्यावर रझियाने महिलेला सरबत प्यायला दिलं. त्यानंतर घराचं समोरचं दार बंद केलं. वसीम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पीडितेचा बळजबरीने विवाह लावून दिला होता.
'भीतीमुळे हा प्रकार कोणाला सांगितला नाही'
तक्रारीत म्हटलं आहे की, वर्षभर या 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करत होता. पीडीतेचा पती कामासाठी पुण्यात गेला असता पीडितेच्या घरात शिरुन अनेकदा शिवीगाळ करत होता, असंही तक्रारीत म्हटलं आहे. त्याने केलेला प्रकार पीडितेने तिच्या वडिलांनादेखील सांगितला होता. मात्र घरातील कोणीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. तिच्या वडिलांनीही संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. वसिम हा 35 वर्षीय पीडितेला वारंवार धमकी देत होता. नवऱ्यासोबत घटस्फोट घे आणि माझ्यासोबत निकाह कर, नाही तर तुला आणि कुटुंबीयांना संपवून टाकेन, अशी दमदाटी करत होता. शेवटी त्याने बळजबरीने पीडितेशी विवाह देखील केला. त्याच्या भीतीमुळे हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही, असं तक्रारीत नमूद केलं आहे.
No comments:
Post a Comment