वेध माझा ऑनलाइन - ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीकरिता सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे...कराड तालुक्यात पहिल्या फेरीत टेबल क्रमांक 1 ते 20 वर हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगणोळे, घोलपवाडी, अंतवडी, आणे, पाडळी (हेळगाव), मनु, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके, चरेगाव, तळबीड, वडगाव हवेली या गावांचा समावेश आहे दुसऱ्या फेरीत टेबल क्रमांक 1 ते 14 वर जुने कवठे, विजयनगर, डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी, जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव, कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या गावांचा समावेश असुन मतमोजणी नऊ वाजता सूरू होणार आहे.
कराड तालुका मतमोजणी करिता ठिकाण व व्यवस्था -
नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय कराड, टेबल-20, RO- 26, ARO- 33, शिपाई व कोतवाल - 40, पर्यवेक्षक, सहायक - 28 इतर अधिकारी व कर्मचारी -20
वाहतूक मार्गात बदल...
नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग-- भेदा चौक ते शाहू चौक कडे जाणारा रोड, दत्त चौक ते शाहू चौक जाणारा रोड, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रोड- पोपटभाई पेट्रोल पंप ते दत्त चौक जाणारी वाहतूक बंद असणार आहे.
भेदा चौका कडून दत्त चौकाकडे जाणारी वाहने भेदा चौक- विजय दिवस चौक या मार्गाने कराड शहरात जातील.
कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहतूक व दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही कोल्हापूर नाका- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक विजय दिवस चौक मार्गे जातील.
दत्त चौक ते शाहू चौक, भेदा चौक बाजूकडे जाणारी वाहने ही दत्त चौक-कर्मवीर पुतळा-विजय दिवस चौक भेदा चौक मार्गे जातील.
वारंजी कडून जुन्या कोयना पुलावरून कराड शहरात येणारी वाहने ही दैत्यनिवारणी चौक- अजिंठा चौक पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक मार्गे जातील मात्र शाहू चौकात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
पार्किंग व्यवस्था-
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणारी शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या वाहनांसाठी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी भेदा चौक, दैत्यनिवारणी मंदिर परिसर, साईबाबा मंदिर परिसर दत्त चौक या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती कराड वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी दिली
No comments:
Post a Comment