वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील आटके येथे तब्बल तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. पैलवान धनाजी पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवत लोकनियुक्त सरपंचपद काबीज केले. सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी नितीन पाटील यांनी प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. तर ग्रामविकास पॅनेल यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले.वार्ड क्रमांक १ मध्ये सर्व उमेदवार पैलवान धनाजी पाटील यांच्या गटाचे विजयी झाले तर वार्ड क्रमांक २ व ४ मध्ये परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. वार्ड क्रमांक ३ मध्ये १ जागा परिवर्तन पॅनेलला तर १ जागा धनाजी पाटील यांच्या पॅनलला मिळाली. वार्ड क्रमांक ५ मध्ये २ जागा परिवर्तन पॅनेलला तर १ जागा धनाजी पाटील यांच्या पॅनलला मिळाली.
No comments:
Post a Comment