वेध माझा ऑनलाइन - राजकारणामध्ये नम्रतेने वागणारे नेते जरूर असतात तसेच उद्दामपणे सत्तेच्या मस्तीला डोक्यावर घेत उद्धट व फटकळपणे व्यक्त होणारेही नेते असतात... आज भाजपच्या राज्याच्या महिला आघाडी अध्यक्ष चित्राताई वाघ कराडात आल्या होत्या मोजून 5 मिनिटे थांबून त्यांनी आपल्या उद्दाम बोलण्याने त्यांचे स्वागत करायला आलेल्या कार्यकर्त्यासह त्याठिकाणी पत्रकारांनाही आपल्या फटकळ स्वभावाचा प्रत्यय दिला आणि त्या पुढे सातारला निघून गेल्या... तब्बल 2 तास त्यांची वाट पाहत त्याठिकाणी ताटकळत थांबलेल्या कार्यकर्ते व पत्रकारांना त्या म्हणाल्या... मी तुम्हाला इथे माझी वाट बघायला सांगितलेच नव्हते...
त्याचे असे झाले..
आज सांगली येथील कार्यक्रम आटोपून भाजप महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष चित्राताई वाघ या सातारला जाताना कराडला थांबणार आहेत असे भाजप च्या येथील काही नेते मंडळींकडून पत्रकारांना सांगण्यात आले...त्यानुसार कोल्हापूर नाका येथे भाजप महिला कार्यकर्त्यांसह भाजपचे काही नेते कार्यकर्तेही उपस्थित राहिले... त्याठिकाणी पत्रकार देखील हजर झाले... दुपारी 4 वाजता येणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आल्या 5,30 ला... आणि आल्या- आल्या...मला सातारला जायचं आहे... पटपट सत्कार आवरा असे म्हणु लागल्या...त्यानंतर येथील भाजप च्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गुलाबाचा हार घालून यथोचित सत्कार केला... त्याचवेळी पत्रकारांनी त्यांना बोला असे म्हटले... त्यावर मी इथे बोलणार नाही...सातारला लवकर पोहोचायच आहे असे सांगलीहून स्वतः उशिरा येऊन उगीचच काळजी दाखवणारे वक्तव्य त्यांनी केले... पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पाटणमधील महिला अत्याचाराच्या घटनेविषयी आपले मत मांडण्यास सांगितले तेव्हा मला त्याबद्दल माहितीच नाही असे बोलून त्यांनी त्याठिकाणी प्रतिक्रिया देणे टाळले...त्यावेळी त्यांना पत्रकारांनी सांगितले की आम्ही इथे दुपारपासून गेले 2 तास तुमची वाट बघत थांबलो आहोत...थोडावेळ तरी माध्यमांशी बोला... त्यावेळी त्या उद्दामपणे फटकन म्हणाल्या... मी तुम्हाला इथे माझी वाट बघायला सांगितले नव्हते...सत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मी इथे थांबायला सांगितले नव्हते... असे उद्दामपणे बोलून त्या मोजून पाच मिनिटात कोल्हापूर नाक्यावरून पुढे निघून गेल्या...दरम्यान आपण हे काय बोलून गेलो हे थोड्या वेळाने लक्षात आल्यावर औपचारिक दिलगिरी व्यक्त करायला देखील त्या विसरल्या नाहीत...
दरम्यान, अनेक महिन्यापासून राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे बलात्कार खून अशा घटनां राजरोस घडताना दिसत आहेत अशातच महिलांच्या राज्याच्या नेत्या या नात्याने चित्राताई वाघ यांनी आज दोन शब्द बोलून महिला अत्याचाराविषयी निषेध नोंदवणे येथे गरजेचे होते...मात्र याउलट त्या म्हणाल्या...पाटणमधील महिला अत्याचाराबद्दल मला माहितीच नाही...राज्याच्या नेत्यानी असे बोलणे म्हणजे बेजबाबदारपणाचे बोलणे नाही का? महिला नेत्या म्हणून आपण ज्या जिल्ह्यात कार्यक्रमासाठी चाललो आहोत त्याच जिल्ह्यातील घटनेची माहिती न घेता त्या ठिकाणी जाणे म्हणजे आपल्याच अकलेचे तारे आपणच तोडण्यासारखे नाही का? असे अनेक प्रश्न त्यांच्याबद्दल यानिमित्ताने निर्माण झाले असतानाच आज पत्रकारांना त्यांचे येथे आल्यापासूनचे उद्दामपणे बोललेल सगळंच खटकल...शिवाय त्यांचे स्वागत करायला आलेल्या कार्यकर्त्याना देखील त्यांनी दिलेली फटकळ वागणूक खटकली हेच याठिकाणी दिसून आले !
No comments:
Post a Comment