वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज पहाटे अपघात झाला. फलटण परिसरातील पुणे- पंढरपूर रस्त्यावर मलठणमध्ये ही घटना घडली. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे चालकाचे वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलावरून तीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. ज्या वाहनाचा अपघात झाला त्या वाहनामध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या घटनेमध्ये जयकुमार गोरे हे किरकोळ जखमी झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या अपघाताबाबत जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी जयकुमार गोरे यांच्या तब्यतीची पत्रकारांना पुण्यात माहिती देताना अपघाताबाबत शंका वाटत असल्याचं म्हटलं आहे हा अपघात म्हणजे घातपाताचा प्रकार असावा अशी शंका येत असल्याचं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
'अपघाताबाबत शंका'
आमदार साहेबांची तब्येत आता चांगली आहे. माझं त्यांच्यांशी बोलणं झालं. मात्र मला अपघाताबाबत थोडी शंका येते. अपघात होऊ शकतो एवढं रस्त्याने ट्राफिक नव्हतं. तो रस्ता अपघात होण्यासारखा देखील नाही. त्यामुळे मला या अपघाताबद्दल शंका येते. जयकुमार गोरे हा अपघात म्हणजे घातपाताचा प्रकार असावा अशी शंका येत असल्याचं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.
दहिवडीला जात असताना अपघात
आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. जयकुमार गोरे यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment