Saturday, December 10, 2022

मंत्री चंद्रकांतदादांवर शाइफेक करणाऱ्यांची ओळख पटली !; कोण आहे तो?

वेध माझा ऑनलाईन - भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्य़क्रमासाठी आले असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मनोज गरबडे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये ओळखला जातो.

मनोज हा समता सैनिक दलाचा  कार्य़कर्ता असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजीदेखील केली. त्यानंतर लगेच त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, मनोज गरबडेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट सुरू झाल्या आहेत. अनेकजण त्याच्या समर्थनार्थ पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे.



No comments:

Post a Comment