दरम्यान, या निवेदनात म्हटले आहे...
जैन धर्म हा पुरातन आणि स्वतंत्र आहे या धर्मातील वर्तमान चोवीस तीर्थंकरापैकी वीस तीर्थंकर ज्या सिद्धक्षेत्रावरून मोक्षाला गेले, ते झारखंड मधील श्री सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजी अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. या क्षेत्रावर जैन समाजातील सर्वांची श्रद्धा आहे या क्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो श्रावक- श्राविका दरवर्षी यात्रा करीत असतात. झारखंड सरकारने या जैन धर्माच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धक्षेत्र शिखरजिला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे यामुळे जैन समाज दुखावलेला आहे या क्षेत्राचे पूर्वीप्रमाणेच पावित्र्य आणि स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी आम्ही सर्वजण अहिंसक आणि शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहोत.तसेच आज रोजी बंदच्या आवाहनाद्वारे निवेदन करीत आहोत. तरी या आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा असेही दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे
दरम्यान हा मुकमोर्चा रविवार पेठेतील जैन मंदिरापासून चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक, दत्त चौक ते तहसीलदार कचेरी याठिकाणी आला त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले
No comments:
Post a Comment