Thursday, December 8, 2022

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता गमावली ; काँग्रेसने सत्ता केली काबीज ...

वेध माझा ऑनलाइन - भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवत भाजपला धोबीपछाड दिला आहे. खरं तर हिमाचल प्रदेश हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या राज्यातच भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याने पक्षाला हा मोठा धक्का आहे.
दरम्यान, काँग्रेसने हिमाचल प्रदेशात 40 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता काबीज केली आहे. तर भाजपची मजल अवघ्या 25 जागांपर्यंतच गेली आहे

No comments:

Post a Comment