Sunday, December 18, 2022

एकनाथ खडसेंचा फोटो केबिन मधून काढून टाकला ; जिवंतपणी कोणी फोटो लावत का?गिरीश महाजनांचा खडसेना टोला ;

वेध माझा ऑनलाइन - जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सातवे आस्मान दाखवत पराभूत केलं. त्यानंतर आज चेअरमनपदीची निवडणूक झाली. यावेळी, एकनाथ खडसे यांचा फोटो हो केबिनमधून काढून टाकण्यात आला आहे. 'जिवंतपणी कुणी कसं काय फोटो लावतो' असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंना टोला लगावला'

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने एकनाथ खडसेंची सत्ता संपुष्टात आणत विजय मिळवला आणि या विजयानंतर आज चेअरमनपदाची निवड करण्यात आली. यात आमदार मंगेश चव्हाण यांची मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत चेअरमनपदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीनंतर दूध संघातील चेअरमन केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आला.
गिरीश महाजनांसमोर हा फोटो हटवण्यात आला असून 'आम्ही मंत्री असलो तरी आमचे फोटो आम्ही लावत नाही मात्र जिवंतपणी कोण कसं काय फोटो लावतो? असा टोला यावेळेस गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला आहे.

No comments:

Post a Comment