वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पुढील काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मंगळवारी महाराष्ट्रातून गेलेल्या ट्रकवर कन्नड रक्षक वेदिकेच्या लोकांनी दगडफेक केली. या घटनेवर महाराष्ट्रातदेखील पडसाद उमटले. पण मुख्यमंत्री या गोष्टीवर शांत का आहेत, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.
सीमा भागात मराठी जनतेवर कर्नाटककडून होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर बाब आहे. या हल्ल्यामुळे या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली जात आहे. त्यांच्यावर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दादागिरी सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करून मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले. पण, मुख्यमंत्री गप्प आहेत. सीमाप्रश्नावर महाराष्ट्राची भूमिका काय आहे? पुढचे धोरण काय? यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे
No comments:
Post a Comment