वेध माझा ऑनलाइन- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप शरद पवारांनी केला.ते कराडमध्ये एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. राज्यपाल यांनी ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले.
उदयनराजेंची भूमिका चांगली
उदयनराजेंनी भूमिका चांगली घेतली. त्याबाबत समाधान आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे, असं शरद पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment