वेध माझा ऑनलाइन - महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात शाईफेक झाली होती. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पाटील यांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मात्र, आज सकाळी त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील फेसशिल्ड घालून आले होते. पुणे येथील पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते. याचे फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहे.
चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दोन व्यक्तींनी फेसबुक पोस्ट करत ही धमकी दिली होती. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून फेसशिल्ड लावत उद्घाटन केलं. 'आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.' पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती. ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment