वेध माझा ऑनलाइन - सैन्यदलातील जवानांचा समाजात आदर हा झालाच पाहिजे. माजी सैनिकांनी देशाचा आदर्श नागरीक बनुन समाज सुधारणेसाठी प्रयत्न करावा. आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांना शिस्त लावुन प्रत्येक घरातील एकतरी तरुन सैन्यदलात भरती होवुन तो अधिकारी व्हावा यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागेल ती मदत दिली जाईल. माजी सैनिकांना आपसातील, भावकीतील मतभेद मिटवुन एकोप्याने रहावे, असे आवाहन कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले.
माजी सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आयोजीत माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कर्नल डी. के झा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, भुमि अभिलेख उपाधिक्षक बाळासाहेब भोसले, अॅड. संभाजीराव मोहिते, स्टेट बॅंकेचे अधिकारी यादव, लेष्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, मोहिते प्रतिष्ठानचे विक्रम मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदेले, जिल्हा सैनिक कार्यालयातील संघटक रामचंद्र जाधव यांच्यासह वीर माता, विर पिता, वीर पत्नी, त्यांचे कुटुंबीय, मिल्ट्री बॉईज अॅकेडमीचे विद्यार्थी, एसजीएम एनसीसीची सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रांताधिकारी दिघे म्हणाले, भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवानांची आणि माजी सैनिकांची संख्या सातारा जिल्ह्यात मोठी आहे. माजी सैनिक निवृत्त होवुन गावी आल्यावर त्यांचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील. आवश्यकता असल्यात मला आणि तहसीलदारांना थेट भेटावे.
तहसीलदार पवार म्हणाले, अमृत वीर जवान अभियान शासनाकडुन सुरु आहे. त्याअंतर्गत सर्व सैनिकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणुक करण्याची कार्यवाही केली जाते. ज्यांचे अजुनही प्रश्न प्रलंबीत आहेत, त्यांनी थेट मला भेटुन त्या समस्या मांडाव्या. त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. कर्नल झा यांनी सैन्यदलात, प्रशासकीय सेवेत विद्यार्थी अधिकारी व्हावे यासाठी मी मार्गदर्शन करत असल्याचे सांगीतले. श्री. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वीर माता, विर पिता, वीर पत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित माजी सैनिकांचा प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले. देशभक्तीपर गिते मिनल ढापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली. कॅप्टन इंद्रजीत मोहिते यांनी प्रास्तविक केले. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. सुभेदार मगरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment