वेध माझा ऑनलाइन - बंगालच्या उपसागरात वादळ झाल्याने देशातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमध्ये शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रातही याचा परिणाम होणार आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत होणार असल्याचे सांगण्यात आले असून या भागात रेड अलर्टही देण्यात आला आहे. या वादळाचा दक्षिणेकडे मोठा परिणाम होत असतानाच या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात 11 ते 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment