वेध माझा ऑनलाइन - हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडलं होतं. हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. आता राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी सी वोटर ने ए बी पी न्यूजसाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे. या सर्वेक्षणाचा सॅम्पल साईज 30 हजार आहे. म्हणजे 68 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे.
या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वेळी हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा घेत भाजपनं एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. 33 ते 41 जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. असं असलं तरी सत्तेत भाजपच असेल असं चित्र या सर्व्हेतून दिसतंय. तर काँग्रेसच्या मात्र जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस 24 ते 32 पर्यंत जागा जिंकू शकतो असा सर्व्हेचा अंदाज आहे. आपला मात्र इथे शून्य जागा मिळतील असं सर्व्हेतून दिसतंय.
No comments:
Post a Comment