Tuesday, December 6, 2022

माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केला अभिषेक पाटील आणि महादेव शिंदे यांचा सत्कार...

वेध माझा ऑनलाइन - मलकापूर येथील गोकाक पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी अभिषेक पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली त्याबद्दल  कराडचे माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कराड अर्बन बँकेच्या नूतन संचालकपदी निवड झालेबद्दल  महादेव शिंदे यांनाही जयवंत पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले
यावेळी कृष्णा कोयना पतसंस्थेचे संस्थापक अरूण पाटील, काॅग्रेसचे युवा नेते ऋतुराज मोरे यांच्यासह जयवंत पाटील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील म्हणाले, गोकाक पाणीपुरवठा आणि कराडची अर्बन बँक या दोन्ही संस्था आपल्या पारदर्शक कारभारासाठी परीचीत आहेत या संस्थांबरोबर काम करणे अभिमानाची बाब आहे.मनोहर शिंदे यांनी गोकाक पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा अभिषेक पाटील यांच्या हाती सोपवली आहे आणि या माध्यमातून  मिळालेल्या संधीचे अभिषेक निश्चितच सोनं करेल असा विश्वास आहे.असे गौरोवोद्गार देखिल  त्यांनी  यावेळी  काढले .तसेच महादेव शिंदे यांची अर्बन बँकेच्या संचालक पदी झालेली निवड ही एकप्रकारे धडाडीच्या व्यक्तीस दिलेली संधी आहे.अशा वेगवेगळ्या माध्यमातून युवा पीढी सामाजिक कार्यासाठी पुढे येत आहे आणि ही सामाजिक भविष्यासाठी समाधानकारक बाब आहे या दोघांच्याही वाटचालीसाठी भविष्यात निश्चितच सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अरुण पाटील यांनी या दोघांचीही झालेली निवड म्हणजे  योग्य व्यक्तींचा सन्मान असल्याचे सांगून या दोघांनाही यापुढे आपले सहकार्य राहिल असे आश्वासन यावेळी दिले...

No comments:

Post a Comment