वेध माझा ऑनलाइन- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदि लागू करण्यात आली आहे.15 दिवसांसाठी हि जमावबंदी असणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. याचबरोबर जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदि लागू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे.
No comments:
Post a Comment