वेध माझा ऑनलाइन - कराड पालिकेकडून येथील स्टेडियम बाहेर असणारी कमान केवळ त्याठिकाणी अक्षरे बसावता येत नाहीत म्हणून काढून टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी फोनवरून पालिकेचे अभियंता ए आर पवार यांना विचारले असता पवारांनी हेच कारण सांगितले आहे...याबाबतचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे... यानिमित्ताने येथील पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या परस्पर सुरू असलेल्या शहरातील भानगडी आता चर्चेतही आल्या आहेत
वारंवार पालिका अभियंता म्हणून विविध चर्चा येथील काही पालिका अधिकारी वर्गाच्या भोवती फिरताना नेहमीच दिसतात...ड्रेनेज मध्ये पडून पालिका कर्मचाऱ्याचा झालेला मृत्यू असो... पालिकेच्या जवळ असलेल्या नगरपालिका शाळेच्या आवारात बेजबाबदारीने त्या ठिकाणी खड्डे काढून ते न बुजवता तसेच विना कम्पोउंड ठेवल्याने त्यात पडून एका चिमुकल्याचा झालेला मृत्यू असो...कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याची घटना असो...कशाचीच फिकीर नसलेले हे अधिकारी आता या कमानीच्या विषयाने नवीन वादात अडकले आहेत...
येथील स्टेडियम बाहेरील कमानिवर अक्षरे बसत नाहीत म्हणून ती कमानच काढून टाकण्याचा शहाणपणा हे अधिकारी करणार असल्याने चार आण्याच्या कोंबडीसाठी...बारा आण्याचा मसाला आणून या अधिकाऱ्यांची पार्टीची तयारी सुरू असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे ...शहरांतून या प्रकाराबाबत संताप देखील व्यक्त होत आहे...लोक याविषयी अनेक प्रश्न विचारत आहेत...
सदरची कमान पाडल्यानंतर याठिकाणी नविन कमान उभारण्यात येणार आहे. तेव्हा जुनी कमान पाडण्याचे पैसे वाया जाणार नाहीत का? या गोष्टींना जबाबदार कोण? पालिकेच्या या कारभाराविरोधात लोकप्रतिनिधी बोलणार की हे सगळं होताना उघड्या डोळ्यानी पाहणार ? ज्यावेळी कमान उभारणी सुरू होती तेव्हा अधिका- यांचे त्याकडे लक्ष नव्हते का? कमान पाडल्यानंतर आधी केलेल्या खर्चाची भरपाई कोण देणार?असे अनेक रास्त प्रश्न लोकांना पडले आहेत त्यांची उत्तरे कोण देणार ? हाही सध्या प्रश्न आहेच !
याबाबत फोनवर विचारणा केली. तेव्हा अधिकारी ए. आर. पवार म्हणाले, कमानीवरील केवळ वरचा गोलभाग काढण्यात येणार आहे. नविन डीझाईन केले असून नांव टाकता येत नसल्याने कमानीचे बांधकाम काढण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार : प्रमोद पाटील
जी कमान पालिकेने पुर्वी उभारली आहे, ती कमान चुकली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. कराडकरांच्या पैशाला कसलीच किमंत नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार आहे. तसेच अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही लागेबंध आहेत काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सी ओ डांगे यांच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांना भकास करण्याच्या डांगेच्या मन्सूब्याला येथील काही पालिका अधिकाऱ्यांचे खतपाणी होते... डांगे त्यांना शाबासकी देत होते...असे करत करत डांगे यांनी शहरातील तोंडे बघून काही अतिक्रमणे काढली खरी ! पण, त्यात अनेक व्यापारी डांगेच्या त्रासदायक कामाच्या पद्धतीने अक्षरशः बेजार झालेले दिसले...त्यानंतर डांगेची उचलबांगडी झाली...पण हे सगळं व्यापाऱ्यांबद्दल घडत असताना पुढे होते ते हेच पालिका अधिकारी...आणि, आता हेच अधिकारी नवीन शहाणपणा करत स्टेडियमची कमान परस्पर काढन्याचा निर्णय घेऊन गावाचे मालक बनू पाहत आहेत ? अशी चर्चा आहे...आणि हा विषय जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार म्हणून गेल्यास तो दाट चिघळण्याची शक्यताही आहे...त्यामुळे आता पाहूया पुढे काय होतय ते !
No comments:
Post a Comment