वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील कवठे येथे आईच्या अंगावर दूध पिताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कालच साताऱ्यात एका चिमुकलीच्या घशात चाॅकलेट अडकल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर आज ही जिल्ह्यात दुसरी घटना घडली आहे या मन हेलवणार्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी स्वाती कृष्णत यादव रा. कवठे, ता. कराड यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या. या दरम्यान, मुलीच्या श्वसन नलिकेत दूध गेल्याने तिला ठसका लागला. यातच तिला उलटी झाल्याने ती बेशुद्ध पडली त्यानंतर लगेचच या चिमुकलीला घरातल्यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अडीच महिन्याच्या या चिमुकलीचं बारसंही अद्याप झालं नव्हतं. या घटनेची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे.
No comments:
Post a Comment