वेध माझा ऑनलाईन - सिमावासीयांच्या भेटीसाठी निघालेल्या राज्यातील दोन समन्वयक मंत्र्यानां कर्नाटकात येवु देण्यात आले नाही. त्याचे पडसाद आज कराडात उमटले. विजापुरहुन साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटकच्या एसटीवर अज्ञातानी दगडफेक केली आहे यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
गेले काही दिवस कर्नाटक आणि महाराष्ट्र वाद सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समन्वय समिती स्थापन केली त्यात मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा समावेश आहे हे दोन मंत्री बेळगावातील तेथील गावांतील लोकांशी संवाद साधणार होते मात्र या मंत्र्यांच्या आगमनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते म्हणुन त्यांना आज कर्नाटक सरकारने दौऱ्यापासुन रोखले आहे.
याचे पडसाद म्हणून झालेल्या वादावादीसह दगडफेकीच्या घटनांमुळे दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान आज मंगळवारी रात्री विजापुरहुन साताऱ्याकडे निघालेल्या एसटीवर अज्ञाताने कऱ्हाड येथे दगडफेक केली.
No comments:
Post a Comment