Wednesday, December 7, 2022

तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं वाटतंय, पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ देऊ नका...मंत्री शंभूराजे देसाई यांचा राऊत याना इशारा...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं म्हणत पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ देऊ नका असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल. त्यांना तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं वाटतंय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना सूचक इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment