वेध माझा ऑनलाइन - पुणे विमानतळार करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे. चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असलयाची चर्चा असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चाचणी करण्यात आला असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.
“चिंता करण्याची गरज नाही. गेल्या ८ ते १० दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे,” अशी माहिती पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितलं की “ती ३२ वर्षीय महिला आहे. त्यांना कोणतंही लक्षण जाणवत नाही आहे. त्यांना सध्या घऱातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे”.
No comments:
Post a Comment