वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्यांची भेट घेण्यासाठी राजभवनात एक मॉडेल आली होती आणि राजभवनात त्या मॉडेलने राज्यपालांच्या खुर्चीसोबत काढलेला फोटो व्हायरल झाला आहे.
राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची मॉडेल मायरा मिश्रा हिने राजभवनात जाऊन नुकतीच भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मॉडेलने शेअर केलेले फोटो मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ट्वीट केलं असून यावरून यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
No comments:
Post a Comment