वेध माझा ऑनलाइन - बांग्लामुक्ती लढय़ातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये गेल्या 24 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस समारोहाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. शुक्रवार दि. १६ रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या रौप्यमहोत्सवी विजय दिवस समारोहाची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी मोठ्या उत्साहात सांगता झाली.
बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून येथे प्रतीवर्षी विजय दिवस समारोहाचे आयोजन केले जाते. यंदा रौप्यमहोत्सव वर्ष असल्याने विजय दिवस समारोह समितीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. महेंद्र भोसले, राष्ट्रीय खेळाडू पौर्णिमा कुंभार, पूर्वा लिबे, योगिनी कोकरे, रोशनी पाटणकर, अदिती चव्हाण, अनुष्का जगताप यांनी आणलेल्या विजय ज्योतीचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विठ्ठल मिणीयार, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस पन्नू, डिंपल पन्नू, ए. एस. पाटील, विजय दिवस समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, समीतीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, विनायक विभुते, दिपक अरबुणे, संगीता साळुंखे, श्रीमती शारदा जाधव, कर्नल झा, माजी सैनिक सेलचे अध्यक्ष गणपतराव शिर्के आदींसह मान्यवरांनी स्वागत केले. दरम्यान मिनल ढापरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची तिरंगा बाईक रॅलीचे आगमन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संचलनाने मानवंदना देण्यात आली. त्यात सैन्यदल, पोलिस, खेळाडू, पोलिसांचे बॅण्ड पथक, एनसीचीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, स्थानिक कलाकार, विजय दिवसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर सातारा पोलिस, २४ मराठा लाईट इंन्फंट्रीच्या बॅन्ड पथकाने धून वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शहरातील मिनल ढापरे आणि वसीम शेख यांच्या मी अॅण्ड सी, डी, टु डी च्या बालचिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तिमपर नृत्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. दरम्यान पॅराग्लायडींग करणारे वाई येथील गोवींद येवलेंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही अंतरावरील ते मैदानावर उतरेपर्यंत उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळून होत्या. मैदानात उतरताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. यावेळी ऍरो मॉडेलिंगचे प्रात्यक्षिकही झाले. विमानाची प्रतिकृती हवेत झेपावण्याचे प्रात्यक्षिकांनीही उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी मल्लखांब प्रात्यक्षिक २३, २४ मराठा लाईट इंन्फंट्री पुणे आणि केरळ - सुभेदार गणपत बेळगावकर, नायब सुभेदार रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी सादर केली. यावेळी त्यांच्या चपळाईचे उपस्थितांनी कौतुक केले. मल्लखांबाच्या कसरती करून जवानांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर सैन्यदलाच्या श्वान पथकाचा डॉ शो झाला. तो पुणे येथील सैन्यदलानी हवालदार एन. एस. तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली कसरती सादर केला. त्यांनी आज्ञा पाळणे, शस्त्रुवर हल्ला करणे, बॉम्बशोधने यासह अन्य कौशल्ये दाखवुन बाळगोपाळांचे लक्ष वेधले. अरुणाचाल प्रदेश त्यांच्या संस्कृतीतील देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केली. त्याच्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी कऱ्हाडकरांना घडवले. त्यानंतर आत्माराम विद्यामंदीर ओगलेवाडीच्या पथकाने लेझीम, जगबंद ढोलताशा पथकाने वादन करुन दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिके सादर केली. होली फॅमिलीच्या विदयार्थ्यांनी बॅण्डचे सुंदर वादन केले. भरत कदम यांनी सुत्रसंचालन केले. सातारा पोलिस बॅण्डच्या राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
No comments:
Post a Comment