वेध माझा ऑनलाइन - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरू केल्या. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी सरकारने अनुदान दिले नाही, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्यांनी भीक मागून शाळा चालवल्या होत्या, असे विधान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पैठणमधल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे विधान केले. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांनी भीक मागून नाही, तर लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून शाळा काढल्या होत्या. चंद्रकांत पाटलांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी मंत्री पदासाठी भीक मागितली होती, असे अमोल मिटकरी म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या ‘भीक मागितली’ या शब्दावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पाटलांवर टीका केली आहे. भाजपमध्ये वाचाळवीर अनेक आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभागातून शाळा उभारल्या होत्या. स्वत:जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक मागितली नव्हती. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे, असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment