वेध माझा ऑनलाइन - देशासह जगात अनेक ठिकाणी कारोना व्हायरस ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली होती. रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णांनी खचाखच भरायला लागली असून, मृत्यूच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. तर राज्यात देखील कोरोना विषाणू उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड रुग्णसंखेत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल सरकारला सूचना देत राहील. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क, पुन्हा लॉकडाऊन का? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे.
अजित पवार यांनी विधानसभेत कोरोना संबंधित चिंता व्यक्त केली.
विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात विदेशातून आलेल्या लोकांमुळं महाराष्ट्रात या विषाणूचा संसर्ग वाढला. त्यामुळं आता इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यानं अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का?कोरोना पसरू नये म्हणून लॉकडाऊन लावणार आहात का?शिंदे-फडणवीस सरकार कोरोनाबाबत कोणत्या उपाययोजना करणार आहे?असा सवाल अजित पवारांनी सरकारला विचारला.त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कोरोना महामारीबाबत उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स किंवा एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारशी समन्वय साधण्यात येणार असून बदलत असलेल्या स्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं.
No comments:
Post a Comment