Friday, December 9, 2022

संतापजनक बातमी ; जेष्ठ अभिनेत्रीची तिच्या मुलाकडूनच हत्या ; 74 वर्षीय अभिनेत्रीची तिच्याच मुलाने बॅटने मारहाण करत केली हत्या ;

वेध माझा ऑनलाइन - अभिनयाच्या दुनियेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या करण्यात आली आहे. जुहूमध्ये एका महिलेच्या हत्येनंतर मृतदेह सापडल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, परंतु आता माहिती मिळाली आहे की ती कथितपणे 74 वर्षीय महिला वीणा कपूर आहे. धक्कादायक म्हणजे अभिनेत्रीच्या मुलावर हत्येचा आरोप असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. वीणा यांच्या हत्येमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 74 वर्षीय अभिनेत्रीची त्यांच्या 43 वर्षीय मुलाने बॅटने मारहाण करत हत्या केली आहे. हत्यानंतर त्याने  मृतदेह एका बॉक्समध्ये भरून फेकून दिला. संपत्तीच्या कारणा वरुन वीणा कपूर आणि त्यांच्या मुलामध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटीं रुपयांच्या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे. 
अभिनेत्री नीलू कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 
पोस्ट शेअर करत नीलू कोहलीने लिहिले- "वीणाजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होतात. मला प्रचंड वाईट वाटतंय. तुमच्यासाठी हे लिहिताना मी नि:शब्द झाले आहे, इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्हाला शांतता मिळेल अशी आशा आहे."

No comments:

Post a Comment