Tuesday, December 20, 2022

कराडात दिनांक 24 ,25 ,26 रोजी यशवंत महोत्सवाचे आयोजन ; यशवंत बँकेचा उपक्रम ; बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची माहिती ...


वेध माझा ऑनलाइन - 
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथील यशवंत बँकेच्या वतीने ‘यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या २४, २५ व २६ डिसेंबर रोजी हा महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ या विषयावर  संगीतमय कथा सादर करणार आहेत. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा.शेखर चरेगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दिनांक 24, 25, 26 डिसेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजता श्री कृष्णामाई घाट येथे हा महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रत्येक सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते महाआरतीदेखील होणार आहे. लोकवर्गणीतून व प्रायोजकांच्या आर्थिक सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जातो. सर्वांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment