Tuesday, October 17, 2023

मीरा बोरवणकर यांनी घेतले थेट आर आर पाटलांचे नाव ; आणखी केले गौप्यस्फोट; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत सोमवारी (16 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर खुलासे केले आहेत. ‘पुण्यातील येरवडा जेलमधील जमिनीच्या लिलावाचे हे एकमेव उदाहरण नसुन महाराष्ट्रात शासनाच्या भूखंडांवर नजर असलेल्या बिल्डर्सचे राजकीय नेते, नोकरशहा आणि पोलिसांशी भयंकर लागेबांधे आहेत,’ असे त्यांनी म्हंटले आहे. येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा करत राज्यात अनेक ठिकाणी सरकारी भूखंड हडपण्याचे प्रकार सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता उद्भवली आहे.

सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना मीरा बोरवणकर यांनी अनेक खुलासे केले. त्या म्हणाल्या, “पुस्तकातील खुलाशानंतर अनेक अधिकारी, माजी न्यायमूर्तींचे मोठ्या प्रमाणावर फोन येत आहेत. कोर्टामुळे औरंगाबादमधील ५० एकरचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला. पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटची जागा एका बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी २०१३ ते २०१६ या काळात आपल्यावर केंद्रीय संस्थांचा दबाव आणला होता, असा संदेश एका अधिकाऱ्याने पाठविला. आता पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाचीसुद्धा जमीन गेली आहे, त्याबद्दलही बोला, असा एका अधिकाऱ्याचा फोन आपल्याला आला,”

“पुण्यात सीआयडीचे अपर महासंचालक पद रिक्त असतानाही आपली नियुक्ती तेथे झाली नाही. येरवडा पोलिस ठाण्याची जमीन देण्यास ठाम नकार देण्याचा परिणाम आपल्या पुढच्या नियुक्तीवर झाला. सीआयडीमध्ये बिल्डरांशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नव्हती. म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आघाडीचा धर्म पाळावा लागेल, असे कारण दिले. पण पुण्यातच नियुक्ती हवी असल्यामुळे कारागृह विभागातील नियुक्ती स्वीकारली,” असे त्या म्हणाल्या.

पुण्यात सीआयडीचे अपर महासंचालक पद रिक्त असतानाही आपली नियुक्ती तेथे झाली नाही. येरवडा पोलिस ठाण्याची जमीन देण्यास ठाम नकार देण्याचा परिणाम आपल्या पुढच्या नियुक्तीवर झाला. सीआयडीमध्ये बिल्डरांशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नव्हती. म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आघाडीचा धर्म पाळावा लागेल, असे कारण दिले. पण पुण्यातच नियुक्ती हवी असल्यामुळे कारागृह विभागातील नियुक्ती स्वीकारली,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “आपण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. तेव्हा ‘मॅडम आपण यात पडू नका,’ असे त्यांनी आपल्याला बजावले होते.

No comments:

Post a Comment