वेध माझा ऑनलाइन । शरद पवार गटातील राष्ट्रवादातील बड्या नेत्यांचा अजितदादा गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत आहे. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आता तसचं पुन्हा लवकरच होण्याची शक्यता आहे असा गाैप्यस्फोट उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.दरम्यान सातारा जिल्ह्यातील काहीजण जे आम्ही शरद पवारांबरोबर आहे असे सांगत आहेत त्यापैकी काहीजण देखील दादा गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि यांपैकीच एकाला साताऱ्याचे पालकमंत्रीपद दिले जाणार असल्याचीही माहिती आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी तशी कल्पना सध्याचे पालकमंत्री देसाई याना दिली असल्याचेही समजते
दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार गटातील राज्यातील अनेक नेत्यांची सरकार सोबत येण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत चर्चा सुरू असल्याचेही माध्यमाशी बोलताना सांगितले .
राष्ट्रवादीचा कोण मोठा नेता शिंदे- फडणवीस सरकार सोबत जाणार याची चर्चा असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील शरद पवार यांच्याबरोबरच आपण आहोत असे सांगणारे अजितदादा गटाबरोबर जातील अशी शक्यता जिल्ह्यात वर्तवली जात आहे त्यापैकी एकजण सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असल्याचेही खात्रीपूर्वक वृत्त आहे तशी बैठक व प्राथमिक चर्चा देखील संबंधितांची झाल्याची माहिती आहे
आणि महत्वाचं म्हणजे याची कल्पना सध्याचे पालकमंत्री खुद्द ना देसाई यांनाही आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच मंत्री देसाई यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असेही समजते
अजितदादा सत्तेत सामील झाल्यावर सातारा जिल्ह्यावर दादांनी पालकमंत्री पदासाठी दावा केला होता त्यानंतर सध्याच्या घडामोडी पाहता टप्या टप्याने दादा जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या राजकारणात आगेकूच करताना दिसत आहेत
सध्या रामराजे नाईक निंबाळकर हे उघडपणे अजितदादांच्या बाजूला आहेत मात्र आता शरद पवार गटातील आणखी कोण अजितदादाबरोबर जाणार ? हे देखील लवकरच समजणार आहे...आणि याचनिमित्ताने ऐन दिवाळीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उलथापालथीचा मोठा धमाका पहायला मिळणार का ? याकडेही सर्वांचे लक्ष आहे
No comments:
Post a Comment