Sunday, October 15, 2023

कराडची बाजार समिती बरखास्त करावी अशी मागणी मी करणार आहे... बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे

वेध माझा ऑनलाइन। कराड बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. मी सोमवारी मुंबईला जाऊन पणनमंत्र्यांना भेटून ही बाजार समिती बरखास्त करावी,अशी मागणी करणार आहे, असे माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले आहेत कराड येथील बाजार समितीची संरक्षक भिंत पाडून रस्ता व्हावा, यासाठी त्रिशंकू भागातील नागरिकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला माजी मंत्री खोत यांनी भेट दिली असता ते बोलत होते. 

ते म्हणाले,"
बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे, आता आम्ही शांत बसणार नाही. रस्ता मिळाला तरी बाजार समितीची चौकशी आम्ही लावणार आहोत आता नाइलाजाने त्यादिशेने जावे लागेल हा रस्त्याचा प्रश्न एकाचा नाही. हजारो कुटुंबाचा आहे. त्यामुळे बाजार समिती माणुसकी म्हणून विचार करणार आहे की नाही? बाजार समिती कोणाची जहागिरी आहे का? असेही खोत म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment